‘अग्रमहोत्सव- २०१७’ चा मुख्य समारोह उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:54 AM2017-09-22T00:54:53+5:302017-09-22T00:54:53+5:30

ग्रमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी श्री अग्रसेन भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

The main event of Agramahotsav | ‘अग्रमहोत्सव- २०१७’ चा मुख्य समारोह उत्साहात

‘अग्रमहोत्सव- २०१७’ चा मुख्य समारोह उत्साहात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अग्रमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी श्री अग्रसेन भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सकल मारवाडी समाजातील विविध मान्यवर आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यावसायिक नंदलाल टकसाली होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मारवाडी युवा संमेलनाचे मा. राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल होते.
सायंकाळी पडलेल्या पावसामुळे उपस्थितांचा उत्साह जरादेखील कमी झाला नाही. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती महाराजा श्री अग्रसेन यांच्या आरतीने करण्यात आली. यावेळ डॉ. सुशील भारुका, विशाल लदनिया, रतनलाल अग्रवाल, संदीप गोयल, सीताराम अग्रवाल, प्रमुल्लकुमार अग्रवाल, निर्मला अग्रवाल, जयश्री अग्रवाल, सीए नवनीत भारतिया, अल्केश अग्रवाल, रजनी बगडिया, वंदना बगडिया, आशिष अग्रवाल, निकेश गुप्ता, महावीर पाटणी आदी उपस्थित होते.
रशिया येथे मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस विजेती इशा अग्रवाल हिचे यावेळी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. राजस्थानी संगीत-नृत्याच्या तालावर फुलांनी सजविलेल्या तीनचाकी सायक लवर तिचा प्रवेश झाला. आधुनिक पद्धतीचा स्वीकार करून अग्रसेन महाराजांची जयंती केक कापून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अग्रवाल सभा, श्री अग्रसेन भवन विश्वस्त मंडळ, श्री महाराजा अग्रसेन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, अग्रवाल महिला समिती, अग्रवाल युवा मंच, अग्रवाल बहु-बेटी मंडळ आदींचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The main event of Agramahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.