वीरप्पनसोबत केली अभिनंदन वर्धमान यांची तुलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:12 PM2019-04-10T23:12:54+5:302019-04-10T23:13:23+5:30

‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.

loksabha 2019 Comparison of Veerappan with Kelmaanandhan Vardhman | वीरप्पनसोबत केली अभिनंदन वर्धमान यांची तुलना

वीरप्पनसोबत केली अभिनंदन वर्धमान यांची तुलना

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसवर टीका करण्याच्या प्रयत्नात सुरेध धस बरळले; चूक लक्षात येताच केली सारवासारव

औरंगाबाद : ‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.
बीड लोकसभा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बीड जिल्हा मित्रमंडळातर्फे भाजपचे आमदार सुरेश धस यांची बुधवारी रात्री कुलस्वामिनी मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. आ. धस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करण्याच्या प्रयत्नात हवाई दलाचे धाडसी अधिकारी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात येताच सारवासारव करीत ‘मला त्यांची तुलना वीरप्पन याच्याशी करायची नाही’, असेही सांगून टाकले.
आ. सुरेश धस म्हणाले की, ‘आधी बॉम्ब टाकायचे आणि ह्यांना सोडायचे. (काँग्रेस नेत्यांना) नको नाही तर हे पण जातील अतिरेक्याबरोबर. (हंशा, टाळ्या) तसं कसं करायचं. मारायचं नाही. पुन्हा माघारी आणायचं भाषण करायला. टावरचं लोकेशन सांगतंय की, तिथं तीनशे मोबाईल होते. जल्लोष करायला बोलावले होते. हे नालायक जे भारताचं सतत वाईट वाईट वाईट... पाहतात. हे अतिरेकी जल्लोष करीत असतानाच्या रात्री विमानं गेली. अडीच हजार ताशी किलोमीटर वेग असतोय त्याचा. त्याठिकाणी पटपट बॉम्ब टाकायचे असतात. २० मिनिटांत तर सगळा कार्यक्रम उरकायचा असतो. ओसामा बिन लादेनला काय दहा-पंधरा दिवस तापासीत होते काय? वटा वटा वटा गेले... खाली उतरले. पटा पटा पकडलं. उचललं. आणलं अन् समुद्रात नेऊन टाकलं. कबरबी नको. कायीच नको. मला वाटतं... यापुढं एअर स्ट्राईक करायचा असल, तर देशाच्या पंतप्रधानाला सांगून काँग्रेसचे दोन-चार लोक खाली लटकवून पाठवा. बॉम्ब टाकताना त्यांच्या हातात कॅमेरे द्या. तेथून खाली सोडा. ते खाली सुटल्यानंतर बॉम्बस्फोट होतील. त्याचं चित्रण करतील. परत त्यांना अणण्यासाठी अ‍ॅम्बसी विनंती करील ना.. आमचे ते खाली सोडलेले काँग्रेसचे नेते भारताकडं सोपवा. म्हणजे इकडं येऊन भाषण करतील. (हंशा.. टाळ्या.. शिट्या..) ‘तो आणला नाही का वीरप्पनसारखा गडी (मिशावर हात दाखवून वर्णन)’ वीरप्पन म्हणून त्यांचा अपमान करणार नाही; पण तो होता एक अभिनंदन पांडे. तामिळनाडूचा. गरीब पठ्ठ्या आला की नाही परत. मारलं त्याला. रक्तबंबाळ केलं. ‘भारत माता की जय’ म्हटलं तरी कळत नव्हतं. (चूक लक्षात आल्यामुळं.) आता काय करावा बबा. बोलावं का नाय. असं झालंय. त्यांची तुलना करत नाही; पण वीरप्पनसारखी स्टाईल हाय त्यांची. मी त्यांची तुलना करणार नाही; पण गडी आमचा ६० तासांत परत आला, अशा पद्धतीने आ. धस यांनी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात आल्यानंतर सारवासरावही केली. तत्पूर्वी, सोशल मीडियामुळे बोलायची भीती वाटत असल्याचेही कबूल केले. या सभेला बीड जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: loksabha 2019 Comparison of Veerappan with Kelmaanandhan Vardhman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.