चाळीस गावांतील गरिबांच्या घरात प्रकाश; वेळे आधीच झाली सौभाग्य योजनेची उद्दिष्ट पूर्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:57 AM2018-05-05T11:57:05+5:302018-05-05T11:59:03+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता.

Light of the poor households in forty villages; Fulfilling the goal of a good fortune out of time | चाळीस गावांतील गरिबांच्या घरात प्रकाश; वेळे आधीच झाली सौभाग्य योजनेची उद्दिष्ट पूर्तता 

चाळीस गावांतील गरिबांच्या घरात प्रकाश; वेळे आधीच झाली सौभाग्य योजनेची उद्दिष्ट पूर्तता 

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आलीमहावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता. राज्यातील १९२ गावांपैकी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे, महावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

या अभियानातून महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गलवाडा, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाडळी दुधा, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ब्रह्मगाव, केज तालुक्यात सोडाळा, अंबाजोगाई तालुक्यात दैठणा राडी, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात नांदुरा बु., जळकोट तालुक्यात मेवापूर, येउरी, देवणी तालुक्यात भोपणी, उदगीर तालुक्यात हंगरगा कुदर, कसराळ, नागलगाव, उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर, उमरगा तालुक्यात मुरली, नांदेड तालुक्यातील पिंप्री महिपल, किनवट तालुक्यात अमवाडी, हदगाव तालुक्यात शिरूर, लायहारी, दोरली, डिग्रज, रावणगाव तामसा, अधार्पूर तालुक्यात लोणी खु., उमरी तालुक्यात राहती खु., धमार्बाद तालुक्यात पांगरी, बिलोली तालुक्यात येसगी, कंधार तालुक्यात राऊतखेडा, मुखेड तालुक्यात पांडुरणी, करणा, केरूर, माखणी, प्रतापपूर, देगलूर तालुक्यात माणस हंगरगा, मूळगाव, चाकूर, हिंगोली तालुक्यात दैठणा, काळगाव, सेनगाव तालुक्यात सिंदीफळ, कळमनुरी तालुक्यात टुपा, वसमत तालुक्यात कौंडगाव, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव आदी गावांचा समावेश आहे. 

पाचऐवजी एक तारखेलाच उद्दिष्टाची पूर्तता
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मेपर्यंत राज्यामध्ये ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात आले.या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील १९२ गावांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गावात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांतील कुटुंबांना शंभर टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांतील १९२ गावांमध्ये वीजजोडणी नसलेल्या कुटुंबांना ५ मेपर्यंत वीजजोडणी दिली जाणार होती. तथापि, हे काम १ मे रोजीच पूर्ण करण्यात महावितरणला यश आले. 

Web Title: Light of the poor households in forty villages; Fulfilling the goal of a good fortune out of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.