मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

By बापू सोळुंके | Published: November 17, 2023 04:22 PM2023-11-17T16:22:55+5:302023-11-17T16:26:08+5:30

काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले .

Give rightful water to Marathwada; The protestors entered the irrigation building and raised loud slogans | मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर: अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले. या विरोधात मराठवाडापाणी हक्क परिषदेच्यावतीने शुक्रवारी सिंचन भवनसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अचानक आंदोलक आक्रमक होत सिंचन भवनमध्ये घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांना रोखणाऱ्या पोलिसांसोबत रेटारेटी करण्याचा प्रयत्न केला .मात्र पोलिसांनी झटापट करीत त्यांना रोखले .

मराठवाड्यात कमी पाऊस पडल्यामुळे येथील लहान मोठी धरणे तळ गाठत आहे . सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ 42 टक्के जलसाठा उरला आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्याला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी सोडण्यात निर्णय महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी 30 ऑक्टोबर रोजी घेतला.या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये ,यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील raजकीय पुढार्‍यांनी जोरदार आंदोलन सुरू केले.शिवाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. या याचिकांची सुनावणी 21 नोव्हेंबर आणि पाच डिसेंबर रोजी होत आहे .

या दोन्ही याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने पाणी सोडण्यास मनाई आदेश दिले नाही. यामुळे तातडीने पाणी सोडणे अपेक्षित असताना पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शासनाने रेड सिग्नल दिला .परिणामी मराठवाड्यातील पाणी प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध जनतेच्या भावना तीव्र होत आहे. शुक्रवारी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी मराठवाडा पाणी हक्क परिषदेच्या वतीने शुक्रवारी दुपारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर निदर्शने करण्यात आली .पाणी आमच्या हक्काचं , नाही कुणाच्या बापाचे, देत कसे नाहीत ,घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखणाऱ्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे करायचे काय,? खाली मुंडके वर पाय, मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे , या घोषणा देत आंदोलन तासभर सुरू होते. 

यावेळी यातील काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले .त्यांच्या पाठोपाठ अन्य आंदोलन ही आले ,यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून आंदोलकांना पायऱ्यावरच रोखले. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांसोबत झटापट करीत वरचा मजला गाठला तेथे मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आधी घोषणा देत अशा घोषणा देत होते. आंदोलकांनी सिंचन भवन दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना तेथेच रोखून धरले आणि काही वेळानंतर महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमणवार हे आंदोलकाकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मागण्याची निवेदन घेतले आंदोलकाच्या भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनात जलतज्ञ डॉ. शंकर नागरे, डॉ. भगवानराव कापसे,नरहरी शिवपुरे, माजी मंत्री अनिल पटेल, उपअभियंता जयसिंह हिरे, संजय वाकचौरे ,विजय काकडे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकादास पाथरीकर यांच्यासह काही उद्योजक आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Give rightful water to Marathwada; The protestors entered the irrigation building and raised loud slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.