गजानन महाराज प्रकट दिन; औरंगाबाद येथील गारखेडा मंदिरातील मूर्तीला ३३ वर्ष पूर्ण

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 13, 2023 07:46 PM2023-02-13T19:46:32+5:302023-02-13T19:55:02+5:30

१९८९ या वर्षी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विश्वस्त अध्यक्ष प्रा. श्रीधर वक्ते दाम्पत्य यांचे हस्ते झाली होती. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तत्कालीन करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेन्द्र सरस्वती देखील आले होते.

Gajanan Maharaj Prakat Din; The idol of Garkheda temple in Aurangabad completes 33 years | गजानन महाराज प्रकट दिन; औरंगाबाद येथील गारखेडा मंदिरातील मूर्तीला ३३ वर्ष पूर्ण

गजानन महाराज प्रकट दिन; औरंगाबाद येथील गारखेडा मंदिरातील मूर्तीला ३३ वर्ष पूर्ण

googlenewsNext

औरंगाबाद : गारखेडा रोडवरील सदगुरू श्री गजानन महाराजांचे मंदिर भाविकांचे श्रद्धेचे स्थान बनले आहे. या मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोर सर्व भाविक नतमस्तक होत असतात. महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. राजस्थानमधून आणलेल्या ३ फूट उंचीच्या या संगमरवरी मूर्तीने ३४ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

पूर्वी श्री क्षेत्र शेगाव ते पंढरपूर दिंडी यात्रा निघत असे. ही दिंडी १९७६ पासून औरंगाबादेत मुक्कामी येत असे. जि. प. मागील मैदानावर मुक्काम असे. महाराजांवरील चित्रपट दाखविला जाई. सोहळ्याचे अध्यक्ष प्रा. श्रीधर वक्ते असत. आपल्या शहरातही श्री गजानन महाराजांचे मंदिर असावे, ही संकल्पना समोर आली. भाविक एकत्र आले. १९८१ मध्ये विश्वस्त मंडळाची स्थापना होऊन अध्यक्ष प्रा. वक्ते बनले. जमीन विकत घेण्यात आली, १९८४ पासून उभारणी सुरू झाली. २ जानेवारी १९८७ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर किशोरकुमार, आशा भोसले, आर.डी. बर्मन यांच्या संगीत रजनीचे आयोजन निधी उभारणीसाठी करण्यात आले. १९९४ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, त्या दरम्यान १९८९ मध्ये महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. २०१८ मध्ये गाभाऱ्याचे नूतनीकरण करण्यात आले. १९८९ पासून प्रकट दिन सोहळा साजरा होत असल्याची माहिती विश्वस्त प्रा. प्रवीण वक्ते यांनी दिली.

१) १९८४ ते १९९४ तब्बल १० वर्षे मंदिराचे बांधकाम.
२) शेगाव संस्थानचे तत्कालीन विश्वस्त व्यवस्थापक शिवशंकर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन.
३) १९८९ या वर्षी गजानन महाराज मूर्तीची स्थापना.
४) १९८९ करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेन्द्र सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
५) प्राणप्रतिष्ठा महोत्सवात पहिले प्रवचन हभप वासुदेव महाराजांचे झाले होते.

Web Title: Gajanan Maharaj Prakat Din; The idol of Garkheda temple in Aurangabad completes 33 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.