नोव्हेंबर अखेरीस येणार पाच शहर बस; शहरवासीयांची प्रतीक्षा संपणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 07:20 PM2018-11-15T19:20:59+5:302018-11-15T19:24:08+5:30

नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

Five city buses to be reached by the end of November; Waiting for city dwellers to wait | नोव्हेंबर अखेरीस येणार पाच शहर बस; शहरवासीयांची प्रतीक्षा संपणार 

नोव्हेंबर अखेरीस येणार पाच शहर बस; शहरवासीयांची प्रतीक्षा संपणार 

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबरअखेरीस ५० बस येणारमात्र तयारीचा आहे अभाव

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका शहर बससेवा सुरू करणार आहे. दिवाळीत ही बससेवा सुरू व्हावी यासाठी मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. महापालिकेला बस बांधणी करून देणाऱ्या कंपनीने दिवाळीपर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

महापालिका एका बसवर तब्बल ३६ ते ४० लाख रुपये खर्च करीत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बसेसही अत्यंत लक्झरी असाव्यात, अशी अपेक्षा टाटा कंपनीकडे व्यक्त करण्यात आली आहे. बसेसची बांधणी कशा पद्धतीने सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी बुधवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी धारवाड येथे भेट दिली. शहरात धावणाऱ्या बसेस कशा असतील याची माहिती त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना घोडेले यांनी सांगितले की, नोव्हेंबरअखेरीस शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. बसेसवर ऐतिहासिक विविध पर्यटनस्थळांचे चित्र आहे. अत्यंत लक्झरी स्वरुपाच्या या गाड्या आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस मनपाला मिळतील. या बसेस चालविण्यासाठी महापालिकेने एस.टी. महामंडळासोबत करार केला आहे. महामंडळ कर्मचारी, डेपो, सर्व्हिसिंग सेटर उपलब्ध करून देणार आहे.

तयारीचा अभाव
येणाऱ्या दीड महिन्यात ५५ बसेस प्राप्त होतील. या बसेस कोणत्या रूटवर धावतील हे निश्चित केलेले नाही. त्यासाठी मनपाने परिवहन समितीही तयार केलेली नाही. तिकिटाचे दर निश्चित करून प्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी घेतलेली नाही. शहरात १०० पेक्षा अधिक अत्याधुनिक बसथांबे मनपाला उभे करावे लागतील. जुन्या बसस्थानकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मनपाने अद्याप तयारीसाठी लागणारी कामेच सुरू केलेली नाहीत. मागील काही दिवसांपासून निव्वळ बस खरेदीची घाई करण्यात येत आहे.

Web Title: Five city buses to be reached by the end of November; Waiting for city dwellers to wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.