वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा ‘पाणावल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:20 AM2018-04-16T01:20:39+5:302018-04-16T01:21:09+5:30

रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना : ६५ कोटींच्या कर्जमाफीसाठी हालचाली सुरु

 Farmers of Vaijapur taluka have got 'blessed' | वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा ‘पाणावल्या’

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा ‘पाणावल्या’

googlenewsNext

वैजापूर : दहेगाव येथील मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करुन ही योजना कायमस्वरुपी सुरु केल्यास तालुक्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त होतील व या भागातील दुष्काळ कमी होईल, असे गोदावरी उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष जे. के. जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, या कर्जमाफीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी तालुक्यातील दहेगाव येथील बंद असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेबाबत सविस्तर माहिती देत कर्ज माफ करण्याची मागणी केली.
ते म्हणाले, ही योजना पंधरा वर्षांपासून बंद असल्याने तालुक्यातील २११७ शेतकºयांवर लाखो रुपयांचे कर्ज असून दुसºया बँका या शेतकºयांना कर्ज देत नाहीत. अशा परिस्थितीत हे शेतकरी कर्जमुक्त होणे काळाची गरज आहे. यासाठी २०१२ मध्ये आम्ही रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन संघर्ष समितीची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. ही योजना एमआयडीसी किंवा रिलायन्स कंपनीने ताब्यात घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना सर्वेक्षण करण्यासाठी या भागात आणले होते. तसेच योजना सुरु न झाल्यास शेतकºयांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पण या प्रयत्नांना यश आले नाही.
२०१५ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेला खºया अर्थाने गती मिळाली. या योजनेसाठी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना वारंवार भेटले. त्यामुळे या योजनेसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्य बैठकीत घेण्यात आला.
कर्जमाफीसाठी वरिष्ठ नेते, मुख्यमंत्र्यांना भेटणार
यावेळी जाधव यांनी तापी खोरे महामंडळांतर्गत असलेल्या नाशिक विभागातील धुळे, नंदूरबार व जळगाव येथील ६४ उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीबद्दल शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रत वितरित केली. या निर्णयामुळे उपसा योजनेचे भूविकास, राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे १४२ कोटी रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. याच धर्तीवर रामकृष्ण योजनेचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांचे शिष्टमंडळ लवकरच वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी मंगेश भागवत, प्राचार्य सुनील कोतकर, दादासाहेब मुंढे, शेख अयुब, महेंद्र काटकर, राम उचित आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Farmers of Vaijapur taluka have got 'blessed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.