चालकाचा हलगर्जीपणा; प्रवासी ताटकळले

By Admin | Published: December 26, 2016 11:50 PM2016-12-26T23:50:31+5:302016-12-26T23:56:15+5:30

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक २ वरून लातूर ते औरंगाबाद या ७ वाजता जाणाऱ्या बसचा चालक मोबाईल स्वीच आॅफ करून गायब झाल्याने औरंगाबाद जाणाऱ्या ८० प्रवाशांची गैरसोय झाली़

Driver's defloration; The passengers were shocked | चालकाचा हलगर्जीपणा; प्रवासी ताटकळले

चालकाचा हलगर्जीपणा; प्रवासी ताटकळले

googlenewsNext

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक २ वरून लातूर ते औरंगाबाद या ७ वाजता जाणाऱ्या बसचा चालक मोबाईल स्वीच आॅफ करून गायब झाल्याने औरंगाबाद जाणाऱ्या ८० प्रवाशांची गैरसोय झाली़ परिणामी, तब्बल दीड तास प्रवासी ताटकळले.
वाहतूक नियंत्रकाने पर्यायी बसची सोय केल्यामुळे नागरिकांची सोय झाली खरी. परंतु ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रिदवाक्याने सेवा देणाऱ्या प्रवाशांना मात्र दीड तास ताटकळत बसावे लागले असल्याचे प्रवासी नीलेश वाणी (जळगाव) यांनी सांगितले. लातूर - औरंगाबाद बसमुळे ८० प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्याचा प्रकार सुरू असतानाच निलंगा येथील एजाज अहमद शेख या विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे ओळखपत्र व आधार कार्डनुसार सवलत दिली. परंतु, जळगाव जाणाऱ्या बसच्या वाहकाने सवलत देण्यास नकार दिला. त्यामुळे या विद्यार्थ्याने बराच वेळा गाडी अडवून धरली.
शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. एकामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशी समजूत घालत पोलिसांनी एजाज शेख या विद्यार्थ्यास बाजूला सारले. एस.टी. महामंडळाच्या गलथान कारभारामुळे माझे सेमिनार हुकले, असे शेख याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Driver's defloration; The passengers were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.