ड्रेनेज चेम्बरमध्ये गुदमरून दोघां जणांचा अंत, एक बेपत्ता, चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:19 PM2019-03-18T23:19:10+5:302019-03-18T23:20:16+5:30

सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारातून शेतीला चोरून पाणी घेण्यासाठी विद्युत मोटारपंपचा फुटबॉल साफ करण्यासाठी ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरलेल्या ७ पैकी दोघांंचा विषारी वायूसमुळे गुदमरून मृत्यू झाला तर, एक जण बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (दि.१८) दुपारी २ वाजेच्या सुमारास पॉवरलूम परिसरात घडली. अन्य चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, ते खाजगी रुग्णालयातील अतीव दक्षता कक्षात(आयसीयू)मृत्यूशी झुंज देत आहेत.

In the Drainage Chamber, the end of both ends, one missing and four serious | ड्रेनेज चेम्बरमध्ये गुदमरून दोघां जणांचा अंत, एक बेपत्ता, चार गंभीर

ड्रेनेज चेम्बरमध्ये गुदमरून दोघां जणांचा अंत, एक बेपत्ता, चार गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देपॉवरलूम परिसर : सुखना नदीतील ड्रेनेज चेम्बरमध्ये घडली घटना, एक मृतदेह सापडेना, चार जणांची आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज

औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारातून शेतीला चोरून पाणी घेण्यासाठी विद्युत मोटारपंपचा फुटबॉल साफ करण्यासाठी ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरलेल्या ७ पैकी दोघांंचा विषारी वायूसमुळे गुदमरून मृत्यू झाला तर, एक जण बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (दि.१८) दुपारी २ वाजेच्या सुमारास पॉवरलूम परिसरात घडली. अन्य चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, ते खाजगी रुग्णालयातील अतीव दक्षता कक्षात(आयसीयू)मृत्यूशी झुंज देत आहेत.
जनार्दन विठ्ठल साबळे (५५, रा. वरझडी), दिनेश जगन्नाथ दराखे (४०, रा. चिकलठाणा) आणि रामेश्वर केरुबा डांबे (रा. निकळक, ता. बदनापूर, जि. जालना), अशी मृतांची नावे आहेत. रामेश्वरचा मृतेदह अद्याप सापडला नसून, तो चेम्बरलाईनमध्ये वाहत गेल्याच्या शक्यतेने महापालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस जेसीबीने ड्रेनेजलाईन फोडून त्याचा शोध घेत आहेत.
रामकिसन रंगनाथ माने (४७, रा. दगडवाडी), उमेश जगन्नाथ कावडे (३२, रा. चिकलठाणा), प्रकाश केरुबा वाघमारे (५५, रा. वरझडी) आणि नवनाथ रंगनाथ कावडे (४०, रा. चिकलठाणा) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्सूलकडून चिकलठाण्याकडे वाहणाऱ्या सुखना नदीपात्रातून महापालिकेने भूमिगत गटार योजनेची महाकाय ड्रेनेजलाईन टाकली आहे. सिडको-हडको, हर्सूल, जाधववाडी, नवा मोंढा आणि चिकलठाणा एमआयडीसीतील गटारे आणि सांडपाणी या ड्रेनेजलाईनमधून वाहते. या ड्रेनेजलाईनवर चारशे ते पाचशे फूट अंतरावर मॅनहोल बांधण्यात आली आहेत. सुखना नदीकाठावरील अनेक शेतकरी भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये मोटारपंप टाकून शेतीसाठी पाण्याचा उपसा करतात. त्यातूनच हा प्रकार घडला.
चिकलठाणा येथील एकनाथ कावडे यांची शेती बटाईने (भागीदारी) दगडवाडी (ता. भोकरदन) येथील रामकिसन रंगनाथ माने, तर विश्वनाथ कावडे यांची शेती जनार्दन साबळे यांच्याकडे होती. दुष्काळामुळे विहिरीचे पाणी आटल्यापासून हे शेतकरी शेतातील लसूण घास, गहू आणि अन्य पिके जिवंत ठेवण्यासाठी भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये मोटारपंप टाकून पाण्याचा उपसा करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास नवनाथ कावडे, जनार्दन साबळे, रामकिसन माने, उमेश कावडे, दिनेश दराखे, प्रकाश वाघमारे आणि रामेश्वर डांबे हे मोटार पंप सुरू करण्यासाठी गेले. चेम्बरमध्ये सोडलेल्या मोटार पंपच्या फुटबॉलमध्ये कचरा आणि गाळ अडक ल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाळात रुतलेला फुटबॉल बाहेर काढण्यासाठी एकापोठापाठ चार जण मॅनहोलच्या ढाप्यावरील लघुछिद्रातून आत उतरले. मात्र, विषारी गॅसमुळे अवघ्या काही मिनिटांत ते गुदमरून चेम्बरमध्येच कोसळले. त्यांना बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या अन्य तीन जणांनाही बाहेर येता आले नाही.घटनेची माहिती मिळताच मनपा अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह जवान आणि पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड, कर्मचारी विक्रम वाघ आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मॅनहोलमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक ते आॅक्सिजन सिलिंडर आणि अन्य साधने अग्निशमन दलाच्या जवांनाकडे नव्हती. यामुळे तातडीने मॅनहोलमध्ये उतरणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मॅनहोलवरील सिमेंटचा मोठा ढापा बाजूला सरकवण्यात आला. आतील वायू बाहेर पडल्याची खात्री झाल्यानंतर जवानांनी सहा जणांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. एक जण त्यांना सापडला नाही, त्यामुळे आतमध्ये उतरलेले रामेश्वर डांबे हे ड्रेनेजच्या पाण्यासोबत वाहून गेले असावेत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तातडीने हलविले खाजगी रुग्णालयात
मॅनहोलमधून बाहेर काढलेल्या बेशुद्धावस्थेतील सहा जणांना तातडीने सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जनार्दन साबळे आणि दिनेश दराखे यांना तपासून मृत घोषित केले. उर्वरित अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले. यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे धूत हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले.

दोन तासांनंतर आले जेसीबी
रामेश्वर डांबे सापडत नसल्याने दुसºया मॅनहोलवरील ढापा उघडून पाहण्यात आले; मात्र तिथेही रामेश्वर न दिसल्याने शेवटी ड्रेनेजलाईन फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता दोन जेसीबी बोलावले; मात्र जेसीबी घटनास्थळी येण्यास तब्बल दोन ते अडीच तास लागले. सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास जेसीबीने ड्रेनेजलाईन खोदण्याचे काम सुरू झाले. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
 

Web Title: In the Drainage Chamber, the end of both ends, one missing and four serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.