औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम रखडले; ५३ कि.मी. रस्ता आहे फक्त ३५ फुटांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:52 PM2018-07-07T16:52:44+5:302018-07-07T17:14:26+5:30

औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाला (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे.

DPR work from Aurangabad to Paithan road; 53km The road is only 35 feet | औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम रखडले; ५३ कि.मी. रस्ता आहे फक्त ३५ फुटांचा

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम रखडले; ५३ कि.मी. रस्ता आहे फक्त ३५ फुटांचा

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद ते पैठण अंतर ५५ कि़ मी.भारतमाला योजनेत समावेश ५०० कोटींच्या आसपास खर्च 

औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाला (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे. बिडकीन परिसरात १९ कि़मी.च्या अंतरात अडथळ्यांवर मात करीत या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी २५० कोटींचा अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला होता. परंतु नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे या मार्गाच्या कामाची जबाबदारी देण्यात आल्याने तो डीपीआर रद्द करून नव्याने डीपीआर करण्याचे ठरले. औरंगाबाद ते पैठण ६० कि़ मी., पैठण ते शेवगाव ३० कि़ मी., २० कि़मी. तीसगावपर्यंत व तेथून पुढे ३० कि़मी. अहमदनगरपर्यंत या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. १४० कि़मी.पर्यंत या मार्गासाठी १ हजार कोटींच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे; परंतु आजवर काहीही वेगवाने हालचाली होताना दिसत नाहीत.

काही ठिकाणी जमिनीचे वाद आहेत. बिडकीनपर्यंत रुंदीकरणात अडचणी आहेत. बायपास करण्यासाठी कुठेही जागा नाही. काही मालमत्तांची तोडफोड करावी लागेल. १९ कि़मी.पर्यंत ही परिस्थिती आहे. मनपाची जलवाहिनीदेखील याच मार्गात आहे. जलवाहिनी काढून स्थलांतरित करण्याचा खर्च २५० कोटींच्या आसपास जाईल, असे एनएचएआयच्या सूत्रांनी सांगितले.

अजून निर्णय झालेला नाही
१९ कि .मी.च्या अंतरात आर्थिकदृष्ट्या जो परवडेल तो पर्याय निवडून त्याची माहिती एनएचएआयच्या मुख्यालयाला कळवावी लागणार आहे. उड्डाणपूल, भूसंपादन करणे अथवा जलवाहिनी स्थलांतरणासाठी मनपाशी चर्चा करण्याचा निर्णय होईल. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासोबत मे महिन्यात या रस्त्याबाबत बैठक झाली. एनएचआयएच्या सूत्रांनी सांगितले, डीपीआरचे काम थांबविले आहे. डीपीआरमध्ये जलवाहिनी व इतर अडचणी आहेत. भूसंपादन व इतर जलवाहिन्यांसह किती खर्च लागणार हे डीपीआरनंतर समोर येईल. 

भारतमालात समावेश होऊनही उपयोग नाही
केंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याचे काम सुरू झाले. भूसंपादन, मार्ग रुंदीकरणात येणारी जलवाहिनी, निवासी घरकुलांची माहिती पुढे आल्यानंतर डीपीआरचे काम बंद पडले आहे. 
 

Web Title: DPR work from Aurangabad to Paithan road; 53km The road is only 35 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.