दुधाळ जनावरे वाटपाला जिल्ह्यात लागेना मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:19 AM2017-10-28T01:19:34+5:302017-10-28T01:19:42+5:30

मराठवाडा पॅकेज अंतर्गत पथदर्शी योजना म्हणून जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थ्यांना दोन गायी आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंंतर्गत मे महिन्यामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही अर्ज दाखल केलेल्या एकाही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

 Distribution of livestock cattle in the district still pending | दुधाळ जनावरे वाटपाला जिल्ह्यात लागेना मुहूर्त !

दुधाळ जनावरे वाटपाला जिल्ह्यात लागेना मुहूर्त !

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाडा पॅकेज अंतर्गत पथदर्शी योजना म्हणून जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थ्यांना दोन गायी आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंंतर्गत मे महिन्यामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही अर्ज दाखल केलेल्या एकाही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने मराठवाडा विशेष पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यातील शेतकºयांना पन्नास टक्के अनुदानाव गाय, म्हैस व शेळी गटाचे वाटप करण्यासाठी दुधाळ जनावरे वाटप योजना सुरू केली आहे. यासाठी ९ मे ते आठ जून दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांकडून पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागितले होते.
जिल्ह्यातील दहा हजार ४३१ शेतकºयांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. प्राप्त अर्जांच्या छानणी अंती जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील नातेवाइक, दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असलेले पशुपालक आणि शेतकरी मिळवून तीन हजार लाभार्थ्यांची निवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यासाठी विलंब होत आहे. परिणामी निधी मंजूर असूनही या पथदर्शी प्रकल्पांतर्गत एकाही शेतक-यांला लाभ मिळालेला नाही.

Web Title:  Distribution of livestock cattle in the district still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.