खुलताबाद शहरात डेंग्यूची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:20 AM2018-12-05T00:20:45+5:302018-12-05T00:21:20+5:30

धूर फवारणी सुरु : सहा मुलांवर उपचार सुरू; डासांचे प्रमाण वाढले

 With dengue in Khulatabad city | खुलताबाद शहरात डेंग्यूची साथ

खुलताबाद शहरात डेंग्यूची साथ

googlenewsNext

खुलताबाद : खुलताबाद शहरात गेल्या महिनाभरापासून डेंग्यूने थैमान घातले असून सध्या औरंगाबाद शहरातील खाजगी रूग्णालयात सहा मुलांवर उपचार सुरू आहेत. तर खुलताबादेत पाच ते सहा जण उपचार घेत आहेत. या आजारांने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत खुलताबाद नगर परिषद व आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
खुलताबाद शहरात डेंग्यूच्या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असून औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात शशांक ज्ञानेश्वर पवार (१२), ऋतूजा बाळू सोनवणे (११), इंद्र संजय चव्हाण (१२), शेख अस्मा शेख सलीमोद्दीन (२०), शेख फहात शेख सलीमोद्दीन, सना शेख मोहमंद हुसेन शेख (२१) यांच्यावर उपचार सुरू आहेत. खुलताबादेत पाच ते सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर चार ते पाच जण या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.
खुलताबाद शहरात डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक काळे यांनी औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. मंगळवारी नगर परिषदेने धूर फवारणी व नालीत औषध टाकण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title:  With dengue in Khulatabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.