खाजगी टँकरची वाहतूकथांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:58 PM2019-05-17T21:58:16+5:302019-05-17T21:58:35+5:30

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे नागरी वसाहतीतून खाजगी टँकर पाण्याची वाहतूक करीत आहेत. या टँकरच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची ...

Demand for transport of private tankers no entry | खाजगी टँकरची वाहतूकथांबविण्याची मागणी

खाजगी टँकरची वाहतूकथांबविण्याची मागणी

googlenewsNext

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे नागरी वसाहतीतून खाजगी टँकर पाण्याची वाहतूक करीत आहेत. या टँकरच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची भिती नागरिकातून व्यक्त केली जात आहे.


येथील ओमसाईनगरातुन खाजगी टँकरद्वारे पाण्याची ने-आण सुरु असते. या टँकरच्या वर्दळीमुळे ओमसाईनगर ते रांजणगाव फाटा या रस्त्यावर कायम वाहतुकीची कोंडी होते. तसेच नागरी वसाहतीतील नागरिक, महिला व लहान मुले यांना जिव मुठीत धरुनच या वसाहतीतून ये-जा करावी लागत आहे. टँकरची सारखी ये-जा सुरु राहत असल्यामुळे रांजणगाव फाटा ते ओमसाईनगर दरम्यान सतत वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारक व नागरिकांना वळसा टाकुन ये-जा करावी लागत आहेत. संबंधित वॉटर सप्लायर्सला ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Demand for transport of private tankers no entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.