दिल्लीची महाराष्ट्रावर आठ गडी राखून मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:18 AM2018-02-10T00:18:05+5:302018-02-10T00:18:54+5:30

प्रदीप सांगवान याची धारदार गोलंदाजी आणि ध्रुव शोरे याची नाबाद शतकी खेळी या बळावर दिल्लीने धर्मशाळा येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात महाराष्ट्राची विजयी घोडदौड खंडित करताना ८ गडी राखून विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीची आक्रमक फलंदाजी आणि विजय झोल याची धीरोदात्त खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

Delhi beat Maharashtra by eight wickets | दिल्लीची महाराष्ट्रावर आठ गडी राखून मात

दिल्लीची महाराष्ट्रावर आठ गडी राखून मात

googlenewsNext
ठळक मुद्देसांगवानचे ५ बळी, ध्रुवचे शतक : शमशुझमा काझी, विजय झोल यांची झुंजार फलंदाजी

औरंगाबाद : प्रदीप सांगवान याची धारदार गोलंदाजी आणि ध्रुव शोरे याची नाबाद शतकी खेळी या बळावर दिल्लीने धर्मशाळा येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात महाराष्ट्राची विजयी घोडदौड खंडित करताना ८ गडी राखून विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीची आक्रमक फलंदाजी आणि विजय झोल याची धीरोदात्त खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर सलग तिसºया सामन्यात विजय झोल आणि ऋतुराज गायकवाड यांनी महाराष्ट्राला ९ षटकांत ६१ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड व कर्णधार राहुल त्रिपाठी २0 धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर विजय झोलने अंकित बावणे याच्या साथीने तिसºया गड्यासाठी ३५ आणि शमशुझमा काझी याच्या साथीने सातव्या गड्यासाठी २४ धावांची भर घालत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो तंबूत परतल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती ७ बाद १७२ अशी बिकट झाली. अशा परिस्थितीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीने हल्लाबोल करताना अनुपम संकलेचा याच्या साथीने ३६ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला ५0 षटकांत सर्वबाद २४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शमशुझमाने महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक ६२ चेंडूंत ६ सुरेख चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची जिगराबज खेळी केली. विजय झोल याने ९३ चेंडूंत ३ चौकारांसह ४६ धावांची धीरोदात्त खेळी केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने २८ चेंडूंतच ६ चौकार आणि २ षटकारांसह स्फोटक ४१ धावा केल्या. अनुपम संकलेचाने २२ व अंकित बावणे याने १८ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून प्रदीप सांगवान याने ४१ धावांत ५ व पवन नेगी याने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात दिल्लीने विजयी लक्ष्य ४४.१ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ध्रुव शोरे याने १२१ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद १0३, हितेन दलाल याने ८७ आणि नितीश राणा याने नाबाद ४९ धावा केल्या. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढे व अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ५0 षटकांत सर्वबाद २४६. (शमशुझमा काझी ५९, विजय झोल ४६, ऋतुराज गायकवाड ४१, अनुपम संकलेचा २२, अंकित बावणे १८. प्रदीप सांगवान ५/४१, पवन नेगी ३/४0).
दिल्ली : ४४.१ षटकांत २ बाद २५0. (ध्रुव शोरे नाबाद १0३, हितेन दलाल ८७, नितीश राणा नाबाद ४९. अनुपम संकलेचा १/४४, श्रीकांत मुंढे १/५0).

Web Title: Delhi beat Maharashtra by eight wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.