दुचाकीच्या धडकेने सायकलस्वार चिमुकला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:32 PM2019-06-01T23:32:08+5:302019-06-01T23:32:17+5:30

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेने सायकलस्वार चिमुकला गंभीर जखमी झाला.

 Cyclist Chimukala injured in a wheelchair | दुचाकीच्या धडकेने सायकलस्वार चिमुकला जखमी

दुचाकीच्या धडकेने सायकलस्वार चिमुकला जखमी

googlenewsNext

वाळूज महानगर : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेने सायकलस्वार चिमुकला गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रुपाली भगवान मते या २४ मे रोजी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मुलगा निरजसोबत दुकानात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, निरजने स्वत:ची सायकल घेतली तर रुपाली या पायी जात होत्या.

बजाजनगरातील ठाकरे चौकातून रुपाली व निरज हे जात असताना शिवतेज शाळेकडून भरधाव दुचाकीने (एम.एच.२०-ई.टी.५३३२)निरजच्या सायकला समोरुन जोराची धडक दिली.

यात निरज गंभीर जखमी झाला. घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला तर मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी निरजला बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी रुपाली मते यांच्या तक्रारीवरुन दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Cyclist Chimukala injured in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.