तडीपार आरोपींनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून गुन्हेगाराला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:17 PM2019-03-28T13:17:45+5:302019-03-28T13:19:43+5:30

या थरारक घटनेतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

The criminals attacked the police and escape the accused | तडीपार आरोपींनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून गुन्हेगाराला पळवले

तडीपार आरोपींनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून गुन्हेगाराला पळवले

सिल्लोड (औरंगाबाद ) : एका गुन्हेगारास अटक करून पोलीस ठाण्याकडे नेत असताना तडीपार आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत गुन्हेगाराला पळवून नेल्याची थरारक घटना बुधवारी संध्याकाळी घडली. तालुक्यातील सोनप्पावाडी शिवारात घडलेल्या या घटनेतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

तालुक्यातील कुख्यात गांजा तस्कर सरदार सांडुसिंग लखवाल अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर आहे. लखवाल सोनप्पावाडी येथील घरी असल्याची गोपनीय माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार देवीदास जाधव व विठ्ठल डोके यांनी आरोपीला मोठ्या शिताफिने सोनप्पावाडीत सापळा रचून पकडले. 

यानंतर त्याला घेऊन पोलीस ठाण्याकडे दुचाकीवर निघाले. लखवाल याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्याचे नातेवाईक योगेश सांडुसिंग लखवाल (34 ) रामधन सांडुसिंग लखवाल (34) व संग्रामसिंग सरदार लखवाल (सर्व रा. सोनाप्पावाडी ) या तडीपार आरोपींना समजले. दोनच कर्मचारी लखवाल याला घेऊन जात असल्याचे हेरून त्यांनी सोनप्पावाडी शिवारात पोलिसांची दुचाकी अडवली. त्यांच्यावर लाठ्याकाठ्या, दगडाने हल्ला चढवत पोलिसांनी खाली पाडले. अचानक झालेल्या हल्ल्याला पोलीस कर्मचारी जाधव आणि डोके यांनी प्रतिकार केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर ट्रॅक्टर घालत चिरडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान लखवाल आरोपींसोबत पळून जाण्यास यशस्वी ठरला.

एक आरोपी अटकेत 
हल्ल्यात जखमी असताना पोलिसांनी लखवाल याचा हल्लेखोर मुलगा संग्रामसिंग याला ताब्यात घेतले आहे. इतर 3 आरोपींच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.

 

Web Title: The criminals attacked the police and escape the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.