जिल्हा वकील संघाची शहर पोलीसवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:56 AM2017-12-12T00:56:04+5:302017-12-12T00:59:40+5:30

गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीनंतर औरंगाबादचा दिग्गज शैलीदार फलंदाज पंकज फलके याच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर जिल्हा वकील सीनिअर संघाने गरवारे क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या ६ व्या राम-कमला औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

 City attorney's team beat the city police | जिल्हा वकील संघाची शहर पोलीसवर मात

जिल्हा वकील संघाची शहर पोलीसवर मात

googlenewsNext

औरंगाबाद : गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीनंतर औरंगाबादचा दिग्गज शैलीदार फलंदाज पंकज फलके याच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर जिल्हा वकील सीनिअर संघाने गरवारे क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या ६ व्या राम-कमला औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पंकज फलकेच या सामन्यात सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
शहर पोलीसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद ११५ धवा केल्या. त्यांच्याकडून सिद्धांत जी. याने २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३६ धावा केल्या. पंकज दळवीने ४ चौकारांसह १९, शेख अलीमने १ षटकार व एका चौकारांसह १७, रिझवान अहमदने १४ व ज्ञानेश्वर वानखरे याने नाबाद ११ धावा केल्या. जिल्हा वकील संघाकडून उदय पांड याने ३० धावांत ३ गडी बाद केले. त्याला अभिलेष पवारने १३ धावांत आणि पंकज फलकेने २० धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. गोपाल पांडेने २३ धावांत १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जिल्हा वकील सीनिअर संघाने विजयी लक्ष्य १५ षटकांत एकही गडी न गमावता गाठले. त्यांच्याकडून शैलीदार फलंदाज पंकज फलके याने चौफेर टोलेबाजी करताना अवघ्या ५५ चेंडूंतच नाबाद ७५ धावा फटकावल्या. त्याला संदीप गायकवाडने ३५ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ३० धावा काढून साथ दिली.

Web Title:  City attorney's team beat the city police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.