औरंगाबाद शहरात होळीची शतकोत्तर परंपरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 07:43 PM2019-03-20T19:43:27+5:302019-03-20T19:43:46+5:30

शहरातील राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकाची मानाची होळी असते.

Centenary tradition of Holi in Aurangabad city | औरंगाबाद शहरात होळीची शतकोत्तर परंपरा 

औरंगाबाद शहरात होळीची शतकोत्तर परंपरा 

googlenewsNext

औरंगाबाद : वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते तो होळीचा सण आज बुधवारी (२० मार्च) सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. ऐतिहासिक शहरातील होळीला शतकोत्तर परंपरा आहे. यात शहरातील राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकाची मानाची होळी असते. याशिवाय जाधवमंडी, सुपारी हनुमान मंदिर रोड, तसेच हर्सूल येथील होळी उत्सव सर्वात जुना मानला जाते. 

राजाबाजारातील मानाची होळी
शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकातील होळी ही मानाची म्हणून ओळखली जाते. संस्थान गणपती ट्रस्टचे विश्वस्त प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, येथील होळीला सुमारे १५० वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. आता संस्थान गणपती ट्रस्ट सोबत राजाबाजार मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने होळी सण साजरा केला जातो. एरंड्याचे झाड आणून चोहीबाजूने लाकड, गोवºया रचली जाते. परिसरातील महिला या होळीच्या चोहोबाजूने सुरेख रांगोळी काढतात. यंदा सायंकाळी ७.३० वाजता होळी दहनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मानाची होळी असल्याने दरवर्षी येथे विविध राजकीय पक्षाचे नेते, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आरतीसाठी येत असतात. पूजा करून होळीचे दहन केले जाते. यानंतर खºयाअर्थाने रंग खेळण्यास सुरुवात होते.

जाधवमंडीत नैसर्गिक रंगाचा वापर 
जाधवमंडी येथील जबरे हनुमान मंदिर परिसरात होळी साजरी केली जाते. पिढ्यान्पिढ्यापासूनची येथे होळी साजरी करण्याची परंपरा आहे. पहिलवान मंडळींचा गढ म्हणून हा भाग ओळखला जातो. येथे होळीच्या नंतर जो रंग उडविला जातो तो नैसर्गिक रंग असतो. 
लेंगी गाणे म्हणत बंजारा समाजातर्फे होळीची पूजा
बंजारा समाजात होळी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ बदलला; पण बंजारा समाजाने आपली संस्कृती, परंपरा कायम ठेवली, याची प्रचीती या सणाच्या निमित्ताने येते. शहरातील बंजारा कॉलनी, जवाहर कॉलनी, सातारा तांडा आदी परिसरात बंजारा समाजातील पुरुष व महिला एकत्र येऊन होळीची पूजा करतात. डफ वाजवत होळीभोवती सात प्रदक्षिणा घातल्या जातात. यानंतर होळी पेटविल्यानंतर लेंगी गाणी म्हटली जातात. 
हर्सूलमधील होळी उत्सव 
शहराच्या उत्तर बाजूस असलेल्या हर्सूल गावातील होळीसुद्धा शतकोत्तर काळापासून सुरू आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन येथे होळी साजरी करतात. विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात उत्सवाला सुरुवात होते. या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे जपलेल्या गावकºयांपैकी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते होळी पेटविली जाते. 

Web Title: Centenary tradition of Holi in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.