औरंगाबाद : मराठा आरक्षण जनसुनावणीत ३० हजार निवेदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:13 AM2018-03-17T00:13:47+5:302018-03-17T00:13:59+5:30

राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी विभाग स्तरावरील जनसुनावणी औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे शुक्रवारी (दि.१६) घेतली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातून तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक निवेदने आयोगाला प्राप्त झाली आहेत.

Aurangabad: Maratha Reservation: 30 thousand Requests in Jan Sunni | औरंगाबाद : मराठा आरक्षण जनसुनावणीत ३० हजार निवेदने

औरंगाबाद : मराठा आरक्षण जनसुनावणीत ३० हजार निवेदने

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी विभाग स्तरावरील जनसुनावणी औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे शुक्रवारी (दि.१६) घेतली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातून तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक निवेदने आयोगाला प्राप्त झाली आहेत. यात आरक्षणाच्या बाजूने, विरोधातील निवेदनांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी सहापर्यंत निवेदन देण्यासाठी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी गर्दी केली होती.
राज्य मागासवर्ग आयोगाने आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांचे सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हास्तरावर नागरिक, संस्था, संघटना यांना मराठा आरक्षणाला विरोध करणारी आणि पाठिंबा देणारे पुरावे सादर करण्यासाठी जनसुनावणी घेतली. सात जिल्ह्यांतील जनसुनावणीनंतर विभाग स्तरावरील सुनावणी शुक्रवारी पार पडली.यावेळी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य सुधीर ठाकरे, डॉ. राजेश करपे, रोहिदास जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Aurangabad: Maratha Reservation: 30 thousand Requests in Jan Sunni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.