औरंगाबाद कृउबा, अडत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:07 AM2018-04-05T00:07:29+5:302018-04-05T00:08:43+5:30

ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले.

Aurangabad Kuruba, the loss of the farmers in the negotiations of obstacles | औरंगाबाद कृउबा, अडत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद कृउबा, अडत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देबंद सुरूच : बाजार समिती आज अडत्यांना बजावणार नोटीस; उद्यापासून कृउबातर्फे ई-लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले. बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून अडत्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाय शुक्रवारपासून कृउबाच्या वतीनेच ई-लिलाव करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
राज्यात एकाच वेळी सर्वत्र ई-नाम योजना सुरूकरण्यात यावी, अशी मागणी करीत जाधववाडी येथील अडत्यांनी शेतकºयांचा शेतीमाल खरेदी करणे बंद केले आहे. यामुळे मागील दोन दिवस फक्त परपेठेतून आलेले धान्य, कडधान्याचेच व्यवहार होताना दिसून आले. यासंदर्भात अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैैस्वाल यांनी सांगितले की, ई-नामची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात कृउबा अपयशी ठरली आहे. फक्त जाधववाडीतच ई-नाम सुरूआहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम योजना सुरू नाही. यामुळे शेतकरीही जाधववाडीऐवजी अन्य बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन जात आहेत. यामुळे येथील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. जोपर्यंत सर्वत्र ई-नाम लागू होत नाही तोपर्यंत आम्ही जाधववाडीत ही योजना लागू करूदेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, खरेदीदार असो वा अडत्या सर्वांना ई-नामनुसारच काम करावे लागणार आहे. जे अडते व खरेदीदार सहभागी होत नाही त्यांना गुरुवारपासून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शुक्रवारपासून सेल हॉल क्र. २ येथे ई-लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज पाच ते सहा टेम्पो भरून गहू, ज्वारी शेतकºयांनी आणले होते. मात्र, अडते शेतमाल उतरून घेण्यास तयार नव्हते. बाजार समितीने माल उतरून घेण्यासाठी शेतकरी भवनची जागा दिली; पण शेतकºयांना भरोसा नसल्याने त्यांनी धान्य परत नेले. यामुळे शेतकºयांनी आपला संताप व्यक्त केला.
हमाल संतापले
जाधववाडीत ई-नाम योजना सुरू झाल्यापासून हमालांना किती हमाली मिळाली, माथाडी मंडळात किती हमाली जमा झाली याची काहीच माहिती नसल्याने आज धान्य बाजारातील हमाल एकत्र आले होते. त्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर जमून सचिव विजय शिरसाठ यांना जाब विचारला.
यावेळी शाब्दिक वादावादी झाली. सर्व हमालांची यादी तयार असून त्यावर हमाली किती मिळाली याची माहिती देण्यात आल्याचे शिरसाठ यांनी निदर्शनात आणून दिले. तसेच हमाली, वराईबद्दल काहीच तरतूद ई-नाम मध्ये करण्यात आली नाही. ही गंभीर बाब राज्य शासनाच्या ते निदर्शनात आणून द्यावे लागेल, असे संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी सांगितले..

Web Title: Aurangabad Kuruba, the loss of the farmers in the negotiations of obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.