सेना-भाजपत कुरघोडी; प्रशासन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:13 AM2017-07-18T01:13:04+5:302017-07-18T01:14:19+5:30

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी भाजप सदस्यांनी सेनेला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला.

Army-BJP combing; The Administration Troubles | सेना-भाजपत कुरघोडी; प्रशासन अडचणीत

सेना-भाजपत कुरघोडी; प्रशासन अडचणीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी भाजप सदस्यांनी सेनेला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. औषध खरेदी, गेट खरेदी, वार्षिक नियोजनाचा आराखडा अशा अनेक विषयांवर सत्ताधारी शिवसेनेला भाजप सदस्यांनी कडाडून विरोध केला. सेना सदस्यांनी एखाद्या विषयाला हाणून पाडण्याचा प्रयत्न केला की, भाजप सदस्य त्या विषयाच्या समर्थनार्थ बाजूने उभे राहायचे. सेना सदस्य विषयाच्या बाजूने असतील, तेव्हा भाजप सदस्य तो विषय हाणून पाडण्यासाठी गोंधळ घालायचे. या दोघांच्या भांडणात मात्र प्रशासनाची अनेकदा अडचण झाली.
सोमवारी दुपारी १ वाजता नियोजित सर्वसाधारण सभा सुरू होणार होती. दीड वाजला तरी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर आणि उपाध्यक्ष केशव तायडे यांचे सभागृहात आगमन झाले नव्हते. त्यामुळे भाजप सदस्य एल. जी. गायकवाड आणि मधुकर वालतुरे यांनी सभेचा कोरम पूर्ण आहे. आपण सभा सुरू करू, अशी भूमिका घेतली व अध्यक्षपदाचे कामकाज भाजप सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांना करण्यास सुचविले. तेव्हा शिवाजी पाथ्रीकर हे अध्यक्षपदाच्या खुर्चीत जाऊन बसले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज वंदे मातरम्ने सुरु करण्याची प्रथा आहे. त्यानुसार भाजप सदस्य गायकवाड यांनी सर्वांना वंदे मातरम्साठी उभे राहण्याची विनंती केली.
हा प्रकार सुरु असतानाच शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे काही सदस्य, अधिकाऱ्यांचे सभागृहात आगमन झाले. तरीदेखील भाजपच्या सदस्यांनी वंदे मातरम् सुरु करेंगे सुरु कर म्हणत चक्क राष्ट्रगीतच म्हणण्यास सुरुवात केली. हा प्रकार शिवसेना सदस्यांच्या लक्षात आला. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपवर राष्ट्रगीत व वंदे मातरम्चा अवमान केल्याचा आरोप केला.
राष्ट्रगीत म्हटल्यामुळे सभा संपली असे जाहीर करावे लागेल, कारण सभेची सांगताच राष्ट्रगीताने केली जाते याची आठवण करून देत सेनेच्या सदस्यांनी भाजप सदस्यांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजप सदस्यांना चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी सभागृहाला विनंती केली आणि वंदे मातरम् झाल्यानंतर रीतसर सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून राष्ट्रगीताने सभा सुरू करणाऱ्या या घटनेचा निषेध अविनाश गलांडे यांनी सभागृहात केला.
त्यानंतर सेनेचे सदस्य अविनाश गलांडे, काँग्रेस सदस्य किशोर बलांडे आणि मनसे सदस्य विजय चव्हाण यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यास कडाडून विरोध केला. १९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेच्या वेळेत आरोग्य केंद्र, उपकेंद्रासाठी औषधी, साधनसामग्री खरेदी करण्यास तब्बल अडीच कोटी रुपये खर्चाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
जि. प. अधिनियमानुसार असा ठराव घेता येतो का, हा विषय गंभीर आहे. तेव्हा मधुकर वालतुरे यांनी या विषयांची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमावी, असा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला. तो सेना व काँग्रेस सदस्यांनी हाणून पाडला. सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी उत्तर देण्याची सभागृहाने मागणी केली.
चर्चेच्या वेळेत आर्थिक बाबींविषयी ठराव घेता येतो का? हो किंवा नाही, यामध्येच उत्तर द्यावे. तेव्हा मंजूषा कापसे म्हणाल्या, अध्यक्षांच्या अधिकारावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यांच्या उत्तरामुळे सदस्य अधिकच संतप्त झाले. अखेर सदस्य अविनाश गलांडे यांनी हा विषय रद्द करण्याचा ठराव मांडला.

Web Title: Army-BJP combing; The Administration Troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.