अंगणवाडीचा पोषण आहार चक्क म्हशीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:02 AM2017-09-12T01:02:27+5:302017-09-12T01:02:27+5:30

गणवाड्याच्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता व लहान मुलांना दिला जाणारा पोषण अहार आता शहरातील म्हशीलाही मिळू लागल्याने या विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

Anganwadi nutrition diet to buffalo | अंगणवाडीचा पोषण आहार चक्क म्हशीला !

अंगणवाडीचा पोषण आहार चक्क म्हशीला !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : अंगणवाड्याच्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता व लहान मुलांना दिला जाणारा पोषण अहार आता शहरातील म्हशीलाही मिळू लागल्याने या विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
परतूर शहरात एका घरात म्हशीला हा पोषण आहार दिला जात असल्याचे काही नागरिकांनी लक्षात आणून दिल्यानंतर महिला व बाल कल्याणच्या उमुख्यकार्यकारी अधिकारी एस. एम. लोंढे यांनी या प्रकरणी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.
पर्यवेक्षक एस. एन. गुट्टे, पी. एम. लगाडे व डी. बी. कायंदे यांनी पंचनामा केला असता एका घरात म्हशीसाठी पोषण आहाराच्या आठ बॅगा आढळून आल्या. आता उप मुख्यकार्यकारी अधिकारी लोंढे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई करू असेही त्यांनी सांगितले. या प्रकाराची परिसरात चर्चा होत आहे.

Web Title: Anganwadi nutrition diet to buffalo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.