भोकरदन तालुक्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:31 AM2018-03-17T00:31:44+5:302018-03-17T00:31:49+5:30

जुई धरणातून अवैध पाणी उपसा करणाºया आठ शेतकºयांचे स्टॉर्टर, केबल व अन्य साहित्य महसूल प्रशासनाने शुक्रवारी जप्त केले.

Action on illegal water peddlers in Bhokardan taluka | भोकरदन तालुक्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई

भोकरदन तालुक्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देजुई धरण : आठ विहिरींवरील साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : जुई धरणातून अवैध पाणी उपसा करणाºया आठ शेतकºयांचे स्टॉर्टर, केबल व अन्य साहित्य महसूल प्रशासनाने शुक्रवारी जप्त केले.
भोकरदन शहरासह २० गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या दानापूर येथील जुई धरणातील अवैध पाणी उपसा बंद करण्याची मागणी नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांच्याकडे केली होती. उपविभागीय अधिकारी गवळी यांनी पाणी चोरी थांबविण्यासाठी नियुक्त पथकाला कार्यकाही करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी महसूल, पंचायत व पाटबंधारे व विद्युत विभागाच्या पथक प्रमुख आऱ एऩ दरबस्तवार, कनिष्ठ अभियंता पी़ सी़ म्हसने, माधुरी जुनावे, नगरपरिषदचे पी. एम. साळवे, तलाठी बी.एम. वाघ, एस. आर. सहाने, ग्रामसेवक सनील पडोळ, पी. बी. समिंद्रे, कैलास पगारे, के. एम. जाधव, एन. के. सोनवणे, संजय दांडगे, के. वाय. गायकवाड, के.बी. कटोरे आदींनी अचानक धरणाच्या परिसरात छापा टाकला. तेंव्हा धरणाच्या लगतच्या विहीरीतून सर्रास पाणी उपसा सुरू असल्याचे आढळुन आले. पथकाने ८ शेतकºयांच्या विहिरीवरील स्टॉर्टर जप्त केले. तर विद्युत मोटारीचे वायरही जप्त करण्यात आले. ज्यांचे साहित्य जप्त करण्यात आले, ते भोकरदन शहरातील प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांची नावे मात्र गुप्त ठेवण्यात आली. विहिरीवर कार्यवाही करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे मला त्याची नावे आता सांगता येणार नाही, असे पथक प्रमुख आर. एन. दरबस्तरवार यांनी सांगितले़
वीजपुरवठा बंद ठेवा
४धरण परिसरातला रात्रीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र पाटंबधारे विभागाच्यावतीने वीजवितर कंपनीला देण्यात आले आहे. दिवसा वीजपुरवठा सुरू करा व रात्रीचा बंद करा जेणे करून धरणातून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली पाणी चोरी थांबविण्यासाठी मदत होईल. . दिवसाला पथक कार्यवाही करेल असे पत्र पाठबंधारे विभागाने विजवितरण कंपनीला दिले असल्याचे पाठबंधारे विभागाचे पथक प्रमुख दरबस्तवार यांनी सांगितले़

Web Title: Action on illegal water peddlers in Bhokardan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.