बिबट्याने पाडला ७ मेंढ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:46 AM2017-12-06T00:46:55+5:302017-12-06T00:46:59+5:30

मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाºया बिबट्याने सोमवारी रात्री लखमापूर शिवारात तब्बल सात मेंढ्यांचा फडशा पाडला. मोकाट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न मात्र शून्य असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

 7 sheeps laden with a leopard | बिबट्याने पाडला ७ मेंढ्यांचा फडशा

बिबट्याने पाडला ७ मेंढ्यांचा फडशा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कायगाव : मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाºया बिबट्याने सोमवारी रात्री लखमापूर शिवारात तब्बल सात मेंढ्यांचा फडशा पाडला. मोकाट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न मात्र शून्य असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
नेवासा येथील पशुपालक अण्णासाहेब बुचडे आपल्या शेकडो मेंढ्या घेऊन चारा-पाण्याच्या शोधात कायगाव परिसरात आले आहे. सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या जाळीच्या साह्याने बंदिस्त केलेल्या मेंढ्याच्या कळपात बिबट्याने उडी घातली. त्यातील मेंढ्यांवर हल्ला करून बिबट्याने पाच पिल्ले आणि दोन मेंढ्यांना अक्षरश: फाडले. एकाच रात्री सात मेंढ्यांवर हल्ला झाल्याचे मंगळवारी सकाळीच पशुपालक अण्णासाहेब बुचडे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी जवळपास शेतवस्त्यावर राहणाºया शेतकºयांना कळविले. जमलेल्या लोकांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना फोन लावला. मात्र वनविभागाच्या कर्मचाºयांनी फोन घेतला नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.
कायगावचे पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन मृत मेंढ्यांची पाहणी केली. मंगळवारी सायंकाळी वनरक्षक डी.यू. गाडगीळ यांनी पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वी याच शिवारात बिबट्याने नजीर पठाण यांच्या शेतवस्तीवर असलेल्या वासराचा फडशा पाडला होता.
सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जुने कायगाव येथील सोमनाथ गायकवाड यांच्या जामगाव शिवारातील शेतात उसाची ट्रक भरण्याचे काम सुरू होते. यावेळी तेथील ऊसतोड कामगारांच्या बैलांवर बिबट्याने धाव घेतली. मात्र समयसूचकता पाळून उपस्थित असलेल्या सगळ्या ऊसतोड कामगारांनी आरडाओरड करून आणि मशाल पेटवून बिबट्याला पिटाळून लावले. तर मंगळवारी दुपारी तीन वाजता पुन्हा जवळच्या फटांगडे यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले . बिबट्याच्या वारंवार होणाºया हल्ल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभागाने तात्काळ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मोहीम हाती घेण्याची मागणी कायगाव भागातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  7 sheeps laden with a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.