११ वी प्रवेश; औरंगाबादेत ‘कहीं खुशी, कहीं गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:09 AM2018-07-06T00:09:20+5:302018-07-06T00:12:10+5:30

आवडीच्या महाविद्यालयात नंबर लागणार का, मित्रांचा लागला, तर मला कोणते महाविद्यालय मिळणार, याविषयीची अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता गुरुवारी (दि.५) संपली.

11th entrance; Aurangabad 'Somewhere Happiness, Somewhere Gum' | ११ वी प्रवेश; औरंगाबादेत ‘कहीं खुशी, कहीं गम’

११ वी प्रवेश; औरंगाबादेत ‘कहीं खुशी, कहीं गम’

googlenewsNext
ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : शिक्षण संचालक कार्यालयाने ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली फेरी केली जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आवडीच्या महाविद्यालयात नंबर लागणार का, मित्रांचा लागला, तर मला कोणते महाविद्यालय मिळणार, याविषयीची अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता गुरुवारी (दि.५) संपली. अकरावीसाठी १९ हजार १५९ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळणार आहे. यात काही विद्यार्थी आवडते महाविद्यालय, शाखा मिळाल्यामुळे खुश होते, तर ज्यांना महाविद्यालय मिळाले नाही, त्यांची नाराजी दिसून आली.
महापालिका हद्दीत ११२ महाविद्यालयांत सर्व प्रकारच्या अकरावी अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांचा आकडा हा २८ हजार ७३५ एवढा आहे. अर्जांची नोंदणी आणि उपलब्ध जागांची संख्या पाहता दहा हजार जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, अनुदानित, विनाअनुदानित जागांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय, शाखा आणि अनुदानित तुकडीत प्रवेश मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. गुरुवारी पहिल्या केंद्रीय प्रवेश फेरीत तब्बल ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली आहे. अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते ९ जुलैदरम्यान कागदपत्रांसह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.
देवगिरी महाविद्यालयाचे मेरिट
देवगिरी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या अकरावीतील अनुदानित जागांवर खुल्या प्रवर्गाचे मेरिट ९१.२० टक्क्यांवर पोहोचले, तर एस.सी. प्रवर्गाचे मेरिट ८२.८०, ओबीसी ७८, एन.टी. ८४.८६ आणि एस.टी. प्रवर्गाचे मेरिट ४७.४० टक्के एवढे लागले. याच महाविद्यालयातील वाणिज्यचे खुल्या प्रवर्गाचे मेरिट ८९.०७, एस.सी. ६९, एस.टी. ५७, एन.टी. ८० आणि ओबीसीचे मेरिट ७५ टक्के एवढे लागले आहे. इतर महाविद्यालयांतील आकडेवारी समजू शकली नाही.
...
प्रवेश घेणे बंधनकारक
शहरात उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांमधील उपलब्ध जागांच्या ६० टक्के जागांवर प्रवेश निश्चित केले आहेत. यात ज्या विद्यार्थ्यांना पसंती दिलेले महाविद्यालय, शाखेला प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही, तर संबंधित विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल. त्याला पुढील प्रवेश फेऱ्यांत भाग घेता येणार नाही.
-मधुकर देशमुख, सहायक
शिक्षण उपसंचालक

Web Title: 11th entrance; Aurangabad 'Somewhere Happiness, Somewhere Gum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.