बांबूपासून महिलांनी तयार केली ज्वेलरी, बांबू ज्वेलरी प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजिवीकेचे साधन

By राजेश भोजेकर | Published: March 9, 2024 04:23 PM2024-03-09T16:23:48+5:302024-03-09T16:24:14+5:30

आठ दिवसीय ज्वेलरी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी महिलांनी बांबू पासून ज्वेलरी तयार करून आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले.

Women made jewelery from bamboo, bamboo jewelery training provided livelihood to women | बांबूपासून महिलांनी तयार केली ज्वेलरी, बांबू ज्वेलरी प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजिवीकेचे साधन

बांबूपासून महिलांनी तयार केली ज्वेलरी, बांबू ज्वेलरी प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजिवीकेचे साधन

चंद्रपूर :  झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे, या उद्देशाने चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात (बीआरटीसी) आठ दिवसीय ज्वेलरी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी महिलांनी बांबू पासून ज्वेलरी तयार करून आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले.

ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच करण्यात आला. 20 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. बाजारपेठेत असलेल्या विविध धातूच्या ज्वेलरी आपल्याला नेहमीच दिसतात, परंतु  बांबू वस्तुंची  वाढती मागणी लक्षात घेता या प्रशिक्षणात महिलांना विविध प्रकारची बांबू ज्वेलरी तयार करण्याचा लाभ आवश्यक साधनसामुग्री सह देण्यात आला. प्रशिक्षणाकरिता संपूर्णा बांबू केंद्र मेळघाट येथून विजय काकडे, कृष्णा मासादे या प्रशिक्षकांना बोलविण्यात आले होते. या प्रसंगी महिलांनी प्रशिक्षणातून विविध डिझाईन मध्ये बांबूपासून ज्वेलरी तयार केली.  
यावेळी जिल्ह्यातील विविध बांबू वस्तू उत्पादक व खरेदीदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून महिलांनी तयार केलेल्या ज्वेलरीचे कौतुक केले आणि खरेदीसुध्दा केले. अश्या प्रशिक्षणातून ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास  केंद्राचे संचालक अशोक खडसे  यांनी व्यक्त केला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुभाष गिरडे,  बीआरटीसी चे पर्यवेक्षक  योगिता साठवणे, वनपाल एस. एस. लाटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Women made jewelery from bamboo, bamboo jewelery training provided livelihood to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.