पोकळ आश्वासनापुढे नमणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:20 AM2019-01-04T00:20:21+5:302019-01-04T00:20:51+5:30

चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच तूर उत्पादक शेतकºयांचे आमरण व साखळी उपोषण सुरु आहे. आरोग्य खालावल्याने आमरण उपोषणास बसलेल्या निलेश राठोड यांना तीन दिवसांपूर्वीच उप जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Will not be prone to empty promises | पोकळ आश्वासनापुढे नमणार नाही

पोकळ आश्वासनापुढे नमणार नाही

Next
ठळक मुद्देशेतकऱ्याचा ठाम निर्धार : पत्र स्वीकारण्यास उपोषणकर्त्याचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच तूर उत्पादक शेतकºयांचे आमरण व साखळी उपोषण सुरु आहे. आरोग्य खालावल्याने आमरण उपोषणास बसलेल्या निलेश राठोड यांना तीन दिवसांपूर्वीच उप जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याची दखल घेत जिल्हा विपनन व खरेदी विक्री संस्थेकडून आश्वासणाचे पत्र घेऊन येणाऱ्याना माघारी पाठविण्यात आले. त्यांनी दिलेले आश्वासन पोकळ असून ठाम आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
राज्य सरकार, नाफेड तथा शासन पुरुस्कृत खरेदी यंत्रणा यांच्याकडून तुर खरेदी प्रक्रियेतील हेडसांड व हेतुपुरस्कर करण्यात येणाºया विलंबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या सर्व समस्यांच्या अनुषंगाने श्वेच्छा निवृत्तीधारक कृषी सहाय्यक निलेश राठोड यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण २६ डिसेंबरपासून सुरू असून राठोड स्वत: आमरण उपोषणास बसले. ३१ डिसेंबरला राठोडची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. १ जानेवारीला जिल्हा विपनन अधिकारी एम.डी. मेश्राम, जिल्हा खरेदी विक्री अधिकारी एस. डब्लु. हजारे, लेखाधिकारी अनिल गोगीरवार, तहससिलदार संजय नागटिळक व पोलीस उपनिरीक्षक मंगेश काळे यांच्या उपस्थितीत चर्चा करून चिमूर येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करू व तूर पाच हजार ६७५ रुपयाच्या हमी भावात खरेदी करून आठ दिवसात ती रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन दिले.
हे आश्वासन विभागाच्या अधिकृत पत्रात लेखी स्वरूपात देण्याची राठोड यांनी मागणी केली. त्याप्रमाणे २ डिसेंबरला जिल्हा विपनण विभाग प्रतिनिधी विलास जुमडे, सहकारी कृषी उद्योग प्रतिनिधी व्ही .एस .मारकवार व मंगेश काळे यांच्या समक्ष पत्र देण्यात आले. मात्र संबधिताकडून वेळकाढू पोकळ आश्वासन असल्याचे निदर्शनास आल्याने राठोड यांनी पत्र घेण्यास नकार दिला. त्यामुळे संबधितांना माघारी फिरावे लागले. जोपर्यंत शासन केंद्र सुरु करण्याकरिता आदेश काढत नाही व त्यानुसार तुर उत्पादक शेतकºयांची नोंदणी करून अहवाल पाठवित नाही, तोपर्यंत केंद्र सुरू होऊच शकत नाही, असे राठोड यांचे म्हणणे आहे.
बच्चू कडू येणार
प्रहार संघटनेचे आमदार बच्चु कडू यांच्या आदेशाप्रमाणे प्रहार संघटनेचे कार्यकर्तेसुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत. या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असून ५ जानेवारीला स्वत: आमदार बच्चु कडू तळ ठोकून बसणार असल्याची माहिती प्रहार संघटना संपर्क प्रमुख राहुल पांडव, शिगाल पाटील यांनी दिली.
प्रकृती चिंताजनक
मागील आठ दिवसापासून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या निलेश राठोड यांची प्रकृती खालावल्याने राठोड यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय, चिमूरचे वैद्यकीय अधीक्षक गो.वा. भगत यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Will not be prone to empty promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप