ती ‘दुल्हनिया’ नेणार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:30 AM2018-04-26T00:30:19+5:302018-04-26T00:30:19+5:30

शिक्षण घेत असताना ती एका युवकाच्या प्रेमात पडली. तिने त्याच्याशी लपून विवाहही केला. त्यानंतर सदर युवतीचे रितीरिवाराजाप्रमाणे दुसऱ्या युवकासोबत लग्न जुळले. साक्षगंधही झाले.

Who will take the 'bride'? | ती ‘दुल्हनिया’ नेणार कोण ?

ती ‘दुल्हनिया’ नेणार कोण ?

Next
ठळक मुद्देपोलीसही हतबल : तो, ती आणि त्याच्यातील गुंतागुंत

प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शिक्षण घेत असताना ती एका युवकाच्या प्रेमात पडली. तिने त्याच्याशी लपून विवाहही केला. त्यानंतर सदर युवतीचे रितीरिवाराजाप्रमाणे दुसऱ्या युवकासोबत लग्न जुळले. साक्षगंधही झाले. विवाहाची तिथी निश्चित झाल्यावर प्रियकराने आपला विवाह सदर युवतीशी झाल्याचे सांगत आपण तिच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले. ज्याच्याशी लग्न जुळले होते, तो युवकही तिच्याशीच विवाह करण्यासाठी ठाम होता. सध्या हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले असून ‘दुल्हनिया’ कोण घेऊन जाईल, याबाबत चवीने चर्चा केली जात आहे. वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील एक युवती बाहेर गावात शिक्षण घेत असताना एका युवकाच्या प्रेमात पडली. या दोघांनीही कायद्यान्वये आपला विवाह उरकून घेतला. शिक्षण पूर्ण करुन युवती स्वगावी आई वडीलाकडे राहावयास आली. त्यामुळे तिच्याकरिता स्थळ शोधणे सुरु झाले. अशातच एका युवकाशी तिचा विवाह निश्चित करण्यात आला. साक्षगंध आटोपून विवाहाची तिथी व स्थळ निश्चित करुन आप्तेष्ठांना निमंत्रण देण्यात आले. विवाह अवघ्या तीन दिवसावर आल्याने प्रियकराने आपला विवाह सदर युवतीशी कायदेशीर मार्गाने झाल्याचे कागदपत्र पोलीस स्टेशनमध्ये सादर केले. त्यावेळी दोघेही सज्ञान होते. त्यामुळे प्रियकराने ती आपली पत्नी आहे. मी तिच्या सोबतच राहणार, असा हट्ट धरला. ही बाब लग्न जुळलेल्या युवकाला कळताच आपले साक्षगंध सदर युवतीसोबत झाल्याने तिच्या सोबतच विवाह करण्याचा निर्धार केला आहे. आता विवाहाची तिथी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. युवतीचे आप्तेष्टांनी पोलीस ठाण्यात जावून ठिय्या मांडला. मात्र पोलीसही या प्रकरणात हतबल आहेत.
पूर्वी झालेला विवाह जोपर्यंत कायद्याने मोडीत निघत नाही, तोपर्यंत त्या युवतीला दुसरा विवाह करता येणार नाही, असे पोलिसांनी युवतीच्या आप्तेष्टांना सांगितले आहे. दुसरीकडे आपला विवाह मोडीत काढायला प्रियकर तयार नाही. त्यामुळे दोन दिवसाने होणाºया विवाह सोहळ्यात युवतीच्या गळ्यात कोणता युवक मंगळसूत्र बांधतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Who will take the 'bride'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न