लोकवाहिणीची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:27 AM2017-10-18T00:27:26+5:302017-10-18T00:27:36+5:30

The wheel of the public stopped | लोकवाहिणीची चाके थांबली

लोकवाहिणीची चाके थांबली

Next
ठळक मुद्देबसस्थानकावर शुकशुकाट : एसटीच्या संपाने प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून पगार वाढीसाठी महाराष्ट्र कामगार संघटना इंटक व कृती समितीने संप पुकारला. या संपाला चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी या एसटी आगारातील सर्वच संघटनेच्या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतल्याने लोकवाहिणीची चाके थांबली होती. त्यामुळे सर्व बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला होता.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना अत्यल्प वेतन मिळते. या वेतनामध्ये परिवाराचे पालणपोषण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत. राज्य महामंडळातील कर्मचाºयांचा करार १ मार्च २०१६ ला संपला. यात एक वर्षाचा कालावधी लोटूनही शासनाने कर्मचाºयांचा करार केला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाºयात असंतोष पसरला होता. या असंतोषाचे रूपांतर एसटी कर्मचाºयांनी संपात केले आहे.
जिल्ह्यातील पाचही आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी यांच्यासह कार्यालयीन कर्मचाºयांनी संपात सहभागी होत आगारात १०० टक्के सहभाग दर्शविल्याचे चित्र होते. गावाला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करीत आपल्या गावाला जावे लागले. या संपामुळे प्रवाशाचे मोठे हाल झाले तर मिळेल त्या साधनाने प्रवाशांनी आपले गाव जवळ केले. एसटीच्या या संपाने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आरटीओंनी केली वाहतुकीची व्यवस्था
जिल्हाभरातील एसटी बसगाड्या संपामुळे बंद असल्याने अनेक प्रवासी अडकले होते. याची दखल घेत चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ५० बसगाड्यांची व्यवस्था करून प्रवाश्यांना सोडून दिले. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला.

Web Title: The wheel of the public stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.