राज्यातील मुलींच्या पहिल्या डिजिटल शाळेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:53 PM2018-07-14T14:53:14+5:302018-07-14T14:55:48+5:30

ग्रामीण भागातील मुलींना डिजिटलमधूनच पूर्ण शिक्षण मिळावे, हा संकल्प शासनाने केला आणि त्या उद्देशानेच शासनाकडून मुलींची पहिली पूर्णत: डिजीटल शाळा बल्लारपुरात उघडण्यात येत आहे.

The way of first digital school of girls in the state is open | राज्यातील मुलींच्या पहिल्या डिजिटल शाळेचा मार्ग मोकळा

राज्यातील मुलींच्या पहिल्या डिजिटल शाळेचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकारसहा कोटींचा निधी उपलब्ध

वसंत खेडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील मुलींना डिजिटलमधूनच पूर्ण शिक्षण मिळावे, हा संकल्प शासनाने केला आणि त्या उद्देशानेच शासनाकडून मुलींची पहिली पूर्णत: डिजीटल शाळा बल्लारपुरात उघडण्यात येत आहे. याकरिता राज्य शासनाकडून सहा कोटी रुपये उपलब्धही झाले आहेत. बल्लारपूरला ही नाविण्यपूर्ण शाळा येथील वनविकास महामंडळ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत होणार असून ही याप्रकारची राज्यातील पहिली शाळा असणार आहे.
ही शाळा पूर्णत: डिजिटल राहील. एवढी की, तेथील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या साऱ्यांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद डिजिटल पद्धतीनेच होईल. वर्ग १ ते १० पर्यंतचे सारे शिक्षण डिजिटलद्वारेच होईल. लेखणी आणि कागद यांचा नाममात्रच उपयोग केला जाईल.
मागास, गरीब व आदिवासी मुलींना अत्याधुनिक शिक्षण मिळून त्या मुख्य प्रवाहात याव्यात हा ही शाळा काढण्यामागचा शासनाचा हेतू आहे. त्यामुळे या वर्गाला या शाळेच्या प्रवेशात प्राधान्य राहणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मागास आणि आदिवासी मुलींना २५ टक्के, नगर परिषद हद्दीतील दारिद्र रेषेखालील मुलींना २५ टक्के असे आरक्षण राहणार असून उर्वरित ५० टक्के जागा सर्वांकरिता खुल्या राहील. त्यांना शुल्क आकारले जाईल. राज्याचे वन, अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने राज्यातील ही पहिली शाळा येथे सुरू होत आहे. या शाळेच्या इमारतीचे काम या वर्षभरात पूर्ण होऊन येत्या शैक्षणिक सत्रापासून तेथे डिजिटल पध्दतीने शिक्षण देणे सुरू होईल, असे सांगण्यात येते.

ख्यातीप्राप्त संस्था सांभाळेल व्यवस्थापन
या शाळेची पूर्ण व्यवस्था बल्लारपूर नगर परिषद सांभाळेल. मात्र, शैक्षणिक व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी पण, डिजिटल बाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण देण्याचा अनुभव असणाऱ्या ख्यातीप्राप्त संस्थेकडे दिले जाणार आहे. तशा संस्थेची निवड निविदा जाहिरात देवून केली जाणार आहे.

यामध्ये बल्लारपूर प्रथम
- हिऱ्यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण बल्लारपूर येथे शासनाच्या कौशल्य योजनेंतर्गत यशस्वीपणे सुरू आहे. राज्यात याप्रकारचे हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे.
- बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचे सौंदर्यीकरण नगर परिषदेच्या वतीने होत आहे. या प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
- आणि आता, राज्यातील मुलींकरिता शासनाची पहिली पूर्णत: डिजिटल शाळा सुरू होत आहे.

Web Title: The way of first digital school of girls in the state is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.