पाईपलाईनने शेतकºयांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:03 AM2017-08-18T00:03:00+5:302017-08-18T00:03:28+5:30

शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला.

 Water to the farmers by pipeline | पाईपलाईनने शेतकºयांना पाणी

पाईपलाईनने शेतकºयांना पाणी

Next
ठळक मुद्दे शिवणी सिंचन प्रकल्प : आग्रहावरुन पालकमंत्र्यांनी केले योजेनेत परिवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला. शेतकºयांनी मागणी केल्यावरुन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेत परिवर्तन करण्याचे मान्य केले. आता शिवणी प्रकल्पातून पाईपलाईनने शेतकºयांना पाणी मिळणार आहे.
१९७४ मध्ये मंजूर झालेला शिवणी चोर येथील प्रकल्प आपल्या पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरु करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार असतानापासून विधीमंडळात लढा दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकºयांशी पालकमंत्र्यांचा संपर्क आला आहे. दीर्घ लढ्यानंतर १९९२ पासून बंद झालेला हा प्रकल्प २०१७ मध्ये महत प्रयासाने सुरु करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लोकार्पण सोहळयाला पोहचल्यानंतर काही शेतकºयांनी या प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी व कमी पाण्यामध्ये बारमाही पिके घेण्यासाठी या प्रकल्पातून कालव्याने पाणी देण्याऐवजी पाईपलाईनव्दारे पाणी देण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांनी योजनेत बदल करण्याची सूचना अधिकाºयांना केली. शिवणी चोर येथे मोठया प्रमाणात भाजीपाला क्लस्टर उभारण्याचा पालकमंत्र्यांचा मानस आहे. शिवणी चोर येथून हैद्राबाद, नागपूर व रायपूर या ठिकाणी भाजीपाला निर्मिती संदर्भातील प्रकल्प त्यांच्या मनात असून यासाठी या सिंचन प्रकल्पातील प्रत्येक पाण्याचा थेंब वापरण्याचा मनोदय त्यांनी यावळी बोलून दाखविला. सिंचनाच्या संदर्भातील योजनामधून पाईपलाईन संदर्भात तरतूद करता येत नसेल तर अन्य एखाद्या योजनेतून ही तरतूद करण्यात येईल. मात्र या ठिकाणच्या शेतकºयांच्या मागणीनुसार त्यांना पाईपलाईनने पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करु, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. या परिसरातील शेतकºयांनी सामुहिक शेतीसाठी प्रयत्न करावे. शेतीतूनच या भागाचा विकास अधिक होऊ शकतो व त्यासाठी आपण प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.
सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता वेमूल कोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थित होती.

Web Title:  Water to the farmers by pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.