हुतात्मा स्मारकाला अद्ययावत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:56 PM2018-10-19T22:56:00+5:302018-10-19T22:56:21+5:30

जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल, अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Update martyr's monument | हुतात्मा स्मारकाला अद्ययावत करा

हुतात्मा स्मारकाला अद्ययावत करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मनपा आयुक्तांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल, अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली. हुतात्मा स्मारकाचे स्वरूप बदलण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. महानगरपालिकेमार्फत संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू आहे. तथापि, केवळ संरक्षण भिंत व डागडुजी न करता या संपूर्ण परिसराचा विकास करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे दीर्घकाळ टिकणारे छायाचित्र संरक्षक भिंतीवर उमटतील अशा पद्धतीचे नियोजन करावे, लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा सुविधा उपलब्ध कराव्या, लहान मुलांसाठी प्लेगार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष निर्माण करावे, महिला व पुरुषासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करावे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा स्मारक असल्याने दुपारच्या वेळेस या ठिकाणी तरुण मुला-मुलींना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करावी, मुलांना या ठिकाणी इतिहासाचे दर्शन होतानाच करिअर करण्याची संधी उपलब्ध होईल अशी बैठक व्यवस्था करावी, अशा सूचनाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Update martyr's monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.