थ्री फेज वीजपुरवठा दिवसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:14 AM2018-11-02T00:14:49+5:302018-11-02T00:16:18+5:30

जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट, वन्यप्राण्यांची दहशत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात आता सातही दिवस ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा सुरू होणार आहे.

Three phase power supply starts in the day | थ्री फेज वीजपुरवठा दिवसा सुरू

थ्री फेज वीजपुरवठा दिवसा सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देधानोरकरांच्या आंदोलनाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट, वन्यप्राण्यांची दहशत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात आता सातही दिवस ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे कृषिपंपांना वीज मिळून शेतीला पाणी देणे सोयीचे होईल.
या संदर्भात आमदार धानोरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेत वीज वितरण कंपनीला राज्याच्या उपसचिवांनी हे निर्देश दिले आहेत.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊ स पडला. त्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक झाले आहे. मात्र, कृषिपंपांसाठी रात्री वीजपुरवठा सुरू केला जायचा. तोसुध्दा अनियमित. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकºयांनी आ. बाळू धानोरकर यांच्यासमोर ही समस्या मांडली. त्यानंतर त्यांनी या संदर्भात पाठपुरावा सुरू केला.
थ्री फेज वीजपुरवठा दिवसा सुरू ठेवण्यासंदर्भात आ. धानोरकर यांनी ऊर्जा मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. १९, २२ आॅक्टोबरला या संदर्भात इशारावजा पत्र दिले. वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांशी बैठकासुध्दा झाल्या.
याच अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांसह ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल शासनाने घेतली. या संदर्भात राज्य शासनाचे उपसचिव भि. य. मंता यांनी महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना थ्री फेज वीजपुरठा सुरू ठेवण्याचे लेखी आदेश दिले.
त्यानुसार चंद्रपूर - गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि राळेगाव उपविभागात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू होणार आहे. रात्रीच्या वेळेस शेतात पाणी देताना शेतकºयांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहेत. या घटना टाळण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस दिवसा थ्री फेज वीजपुरवठा चालू ठेवावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Three phase power supply starts in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज