तीनशे हातपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:30 PM2018-01-22T23:30:09+5:302018-01-22T23:31:07+5:30

यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली.

Three hundred handpumps closed | तीनशे हातपंप बंद

तीनशे हातपंप बंद

Next
ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती : नगर परिषद प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली. मात्र, चंद्रपूर महानगर पालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत २७७ हातपंप बंद असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
नगर परिषदअंतर्गत सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये बहुतेक मुख्य वॉर्डांचाच समावेश आहे. परंतु, मुख्य नळयोजनेच्या पाईपलाईनपासून दूर असणाºया वॉर्र्डांमधील नागरिक हातपंपावर अवलंबून आहेत. शासना विविध योजनामधील हातपंप खोदण्यात आले. जिल्ह्याती नगर परिषद हद्दीमधील सुमारे १००० हातपंप आहेत. या हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी, हातपंप बंद होवूनही तीन ते चार महिने दुरुस्ती होत नसल्याचे उघडकीस आले आहे.
यंदा कमी पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली. काही वॉर्डांमध्ये शंभर फूट हातपंप खोदूनही पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. जादा फूटांवर खोदलेल्या हातपंपाची संख्या कमीच आहे. पण, नादुरुस्त असलेल्या आणि दुरुस्तीनंतर पिण्यास योग्य असणाºया हातपंपाचीच संख्या ३०० हून अधिक भरण्याची शक्यता आहे. हातपंप खोदल्यानंतर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद यांत्रिकी अथवा शासनाच्या अन्य प्राधिकृत यंत्रणेशी करार केला जातो. त्यासाठी नगर परिषदांना शुल्क भरावा लागतो. मात्र, पदाधिकारी व संबंधित अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शुल्क भरण्यात आले नाही. त्यामुळे शेकडो हातपंप बंद पडले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज असणाºया वॉर्डांमध्येच हातपंप बंद असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी अन्य वॉर्डांत भटकंती सुरू असल्याचे चित्र नगर परिषद हद्दीमध्ये दिसून येत आहे.
चंद्रपुरातील २०२ हातपंप बंद
चंद्रपूर मनपा हद्दीत ६५६ हातपंप खोदण्यात आले. या हातपंपामुळे विविध वॉर्डांतील नागरिकांना पाण्याची गरज भागविणे शक्य झाले होते. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने आणि तांत्रिक अडचणीमुळे सध्य:स्थितीत चंद्रपूर शहरात केवळ ४५४ हातपंप सुरू आहेत. उर्वरीत २०२ हातपंप बंद असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. नळ योजनेद्वारे ज्या वॉर्डांत पाणी मिळते, तिथून गरजा भागविण्याची वेळ हजारो नागरिकांवर आली आहे.
निधीची तरतूद करावी
शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक राहणाऱ्या वॉर्डांत अनेक हातपंप खोदण्यात आलेत. मात्र, दुरूस्तीसाठी निधीची तरतुद केली नाही. विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करताना गोरगरीब अवलंबून असणाºया हातपंपांसाठी निधीची तरतूद का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Three hundred handpumps closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.