शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:05 PM2018-05-25T22:05:22+5:302018-05-25T22:05:22+5:30

पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना तीन टक्के महागाई भत्ता लागू करून थकबाकी मिळावी तसेच नक्षलग्रस्त भत्त्याची थकबाकी अदा करावी, यासाठी म.रा प्राथमिक शिक्षक संघाने प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, प्रशासनाने संघटनेशी सकारात्मक चर्चा करुन प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

The teacher's questions will be sorted out | शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार

Next
ठळक मुद्देसकारात्मक चर्चा : प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना तीन टक्के महागाई भत्ता लागू करून थकबाकी मिळावी तसेच नक्षलग्रस्त भत्त्याची थकबाकी अदा करावी, यासाठी म.रा प्राथमिक शिक्षक संघाने प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, प्रशासनाने संघटनेशी सकारात्मक चर्चा करुन प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबळे यांनी गटशिक्षणाधिकारी संजय पुरी व लेखाधिकारी येरणे यांच्या उपस्थितीत संघटनेची तातडीची सभा आयोजित केली होती. महागाई भत्ता थकबाकीसह मे महिन्याचे वेतन काढण्याचे मान्य करण्यात आले. जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले. नक्षलग्रस्त भत्त्याच्या थकबाकी साठीही वाढीव वित्ताची मागणी करण्यात आली आहे. सेवापुस्तिका अद्यावत करण्यासाठी २८ मे ते ५ जून २०१८ दरम्यान केंद्रनिहाय विशेष शिबिराचेही नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय शिक्षकांचे स्थायी आदेश वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव तसेच हिंदी व मराठी सुटचे प्रस्ताव विनाविलंब पाठविण्याचे मान्य करण्यात आले. विषय शिक्षकांची चुकलेली वेतन निश्चिती अर्जित, आजारी रजा प्रकरणे तसेच वैद्यकीय बिलाच्या परिपूर्तीसंदर्भातील संघटनेचे पत्र मिळताच कार्यपूर्ती झाली आहे. थकीत घरभाडे भत्ता, प्रत्येक महिण्याची वेतन स्लीप देणे, आयकर स्ट्रेस पेपर पुरविणे आदी सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून त्यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश संवर्ग विकास अधिकारी पांढरबळे यांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहेत.यावेळी संघटनेतर्फे जिल्हा उपाध्यक्ष किशोर उरकुंडवार, मारोती जिल्हेवार, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सोयाम यांनी समस्या मांडल्या.
विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, चलाख कोपुलवार, कक्ष अधिकारी किरण वाढई तसेच संघटनेचे आकाश कुकुडकर, डॉ. गोकुल कामडी, भोयर, मोहुर्ले, विजय पोलोजवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. समस्या मार्गी लागल्याने शिक्षक संघाने समाधान व्यक्त केले. मुदतीत आश्वासनपूर्ती न झाल्यास भविष्यात आंदोलन करण्याचा इशारा तालुका संघाने दिला आहे.
 

Web Title: The teacher's questions will be sorted out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.