संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:37 AM2018-08-21T00:37:30+5:302018-08-21T00:38:39+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत.

Take action against the constitutional burners | संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा

संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा

Next
ठळक मुद्देमागणी : समता सैनिक दलाचे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. संविधानाची प्रत जाळण्याची घटना घडली आहे. समता सैनिक दलाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून संविधान जाळणाऱ्या विरुद्ध संताप व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान ऐतिहासिक आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी निष्ठेने कार्य केले. त्यांनी आखलेल्या धोरणाचा देशाला विकासासाठी मोठा फायदा झाला. त्यांच्या कर्तृत्वाची आजही ओळख देशाला आहे. परंतु देशद्रोही कृत्य करणारे त्यांनी अथक प्रयत्नातून निर्माण केलेल्या संविधानाची प्रत जाळत आहेत. अशा समाज कंटकाविरुद्ध भारतीय संविधान जाळले म्हणून भारतीय कायदा १९७१ च्या अ‍ॅक्ट १२४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य बौद्धिक प्रमुख डॉ. भास्कर कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी समता सैनिक दलाचे डॉ. भास्कर कांबळे, मार्शल प्रदीप पुणेकर, आनंद दुबे, आनंदा कांबळे उपस्थित होते.
सावलीत निषेध
सावली : दिल्लीतील जंतरमंतर घटनेचा निषेध करीत त्या आरोपींवर कडक कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थायी समितीच्या वतीने ठाणेदार स्वप्निल धुळे यांना देण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्ष लता लाकडे, भावना बोरकर, गीरजा मानकर, कल्पना रायपूरे, हेमलता गेडाम, प्रभा गोंगले, रेखा गेडाम, पार्वता डोंगरे, मेश्राम, खोब्रागडे, सविता सेमस्कर, जयप्रकाश दुधे, राजू व्यास, सुनील गेडाम, रायपूरे आदी उपस्थित होते.

Web Title: Take action against the constitutional burners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस