ताडोबात दिसला काळा बिबटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:07 AM2018-05-24T01:07:33+5:302018-05-24T01:07:33+5:30

कॅमेऱ्यामध्येही कैद : नवे आकर्षण; पर्यटकांनी आनंदाची बातमी सर्वत्र सांगितली

Tadoba saw black leopard! | ताडोबात दिसला काळा बिबटा!

ताडोबात दिसला काळा बिबटा!

Next

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मंगळवारी सायंकाळी पर्यटनासाठी आलेल्या बेल्जियम येथील परिवाराला काळा बिबट दिसला. प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनीही याला दुजोरा दिल्याने पर्यटकांसाठी आता वाघांसह काळा बिबट आकर्षण केंद्र ठरणार आहे.
बेल्जियम येथील जीन फ्रॅन्काईस एर्नाट्स व ज्युलियट डिकास्टेकर हे कुटुंबीय स्वर्णा, झिया, रुबी या मुलींसह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आले आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी ताडोबाची सफारी केली. सफारी शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोळसा वनपरिक्षेत्रातील शिवणझरी परिसरात एका पाणवठ्यावर काळा बिबट असल्याचे दिसले. बिबट पाणी पितानाचे दृश्य ज्युलियट यांनी आपल्या व्हिडीओ कॅमेºयात टिपले. या वेळी त्यांच्यासोबत असलेले गाईड शालिक येरमे व जिप्सीचे चालक प्रफुल येरमे यांनीही हे दृश्य डोळ्यांत साठविले. अचानक झालेल्या काळ्या बिबट्याच्या दर्शनाने सारेच आश्चर्यचकित झाले.
ही मंडळी ताडोबा सफारीवरून बाहेर पडताच ही आनंदाची बातमी साºयांना सांगितली. ज्युलियट यांनी बिबटाचे केलेले चित्रीकरणही अनेकांनी बघितले. एका पर्यटकाने मोबाइलवर या काळ्या बिबट्याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर टाकल्यावर ते व्हायरलझाले. २०१४मध्ये ताडोबात काळा बिबट आढळून आल्याचीही नोंद आहे. मात्र, यानंतर ही दुसरीच नोंद असल्याचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वी ओडिशा येथेही काळा बिबट आढळल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. ज्युलियटने आपण ताडोबात काळा बिबट बघितल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली. छायाचित्रही लवकरच टाकणार असल्याचे त्यात नमूद केल्याने पुन्हा वन्यजीव प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली. बुधवारी सकाळी अनेकांनी याची शहानिशा करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाच्या अधिकाºयांशी संपर्क केला.

Web Title: Tadoba saw black leopard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.