पुरातत्त्व अभ्यासकांनी केली अवशेषांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:00 PM2019-03-15T22:00:49+5:302019-03-15T22:01:16+5:30

गडचांदूर येथील ऐतिहासिक भूमीचा विकास आणि संवर्धनाच्या विहारे, मंदिरे, मुर्त्या, शिल्पे व पुरावशेषांवर संशोधन करण्याच्या हेतूने पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील समन्वयक अश्विन मेश्राम आणि सहकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली.

Surveillance Survey Review by Archaeologists | पुरातत्त्व अभ्यासकांनी केली अवशेषांची पाहणी

पुरातत्त्व अभ्यासकांनी केली अवशेषांची पाहणी

Next
ठळक मुद्देगडचांदुरातील इतिहास पुढे येणार : अभ्यासकांचे प्रथमच लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गडचांदूर येथील ऐतिहासिक भूमीचा विकास आणि संवर्धनाच्या विहारे, मंदिरे, मुर्त्या, शिल्पे व पुरावशेषांवर संशोधन करण्याच्या हेतूने पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील समन्वयक अश्विन मेश्राम आणि सहकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली.
यावेळी पंचशील युग प्रवर्तक बहुहितकारी संस्थेचे अध्यक्ष गौतम भसारकर, प्रा. भानुदास पाटील, किशोर डोंगरे, भीमराव चापले, रोहीत भसारकर आदींची उपस्थिती होती. गडचांदूर परिरात बुद्धकालिन अवशेष सापडले आहेत. यावर अद्याप सखोल अभ्यास झाला नाही.
पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी या संस्थेने मागील एक आठवड्यापूर्वी बुद्धभूमी संदर्भात पुरातत्व विभागाला एक निवेदन दिले होते. त्या निवेदनात परिसरातील प्राचीन स्थळे, मंदिरे, विहारे व अवशेषांविषयी माहिती दिली होती. शिवाय, दुर्मिळ वारशाचे जतन व संवर्धन केले नाही तर नष्ट होऊ शकते, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले होते. पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन परिसराची पाहणी केली.
संशोधकांनी अभ्यासक करून नवीन इतिहास पुढे आणल्यास परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे, अशी माहिती समन्वयक मेश्राम यांनी दिली. हा परिसर मोठा असल्यामुळे येत्या जूनमध्ये पुन्हा एकदा पाहणी करण्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Surveillance Survey Review by Archaeologists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.