आजपासून देवी महाकाली यात्रेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:36 AM2019-04-11T00:36:08+5:302019-04-11T00:36:40+5:30

चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. याकरिता राज्यभरातील भाविकांचे जत्थे बुधवारपासूनच चंद्रपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नये, यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व महाकाली मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण तयारी केली आहे.

Starting today, Goddess Mahakali Yatra starts | आजपासून देवी महाकाली यात्रेला प्रारंभ

आजपासून देवी महाकाली यात्रेला प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देभाविकांचे जत्थे दाखल : महिनाभर भक्तिमय वातावरण, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. याकरिता राज्यभरातील भाविकांचे जत्थे बुधवारपासूनच चंद्रपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नये, यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व महाकाली मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण तयारी केली आहे.
दरवर्षी चैत्र पोर्णिमेला आराध्य दैवत ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात यात्रा भरते. या यात्रेला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक उन्हाची पर्वा न करता दरवर्षी दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे. ट्रक, मेटॅडोर अथवा मिळेल त्या वाहनाने भाविक बुधवारपासून दाखल होत आहेत. भक्तांच्या निवासाकरिता मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय, मंदिराच्या आवारात १८ हजार स्केअर फु टाचा मंडप टाकण्यात आला. आजपासून धर्मशाळा आणि मंदिरासमोरील मैदानात भाविकांनी राहुट्या उभारून निवास करू लागले. शेकडो भाविक महिनाभर मुक्कामी राहुन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात.
भाविकांच्या आरोग्याकरिता महानगरपालिका आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात आरोग्य केंद्र उभारण्यात आले. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व मनपाचे आयुक्त संजय काकडे व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात्रा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. प्रशासनाच्या सुचनेनुसार मंदिर व्यवस्थापन समितीकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

चार हजार क्षमतेचा वॉटर कुलींग प्लान्ट
पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्थापनाने चार हजार लिटर क्षमतेचा वॉटर कुलींग प्लान्ट तयार केला. या प्लान्टला २० पेक्षा अधिक नळ लावण्यात येणार आहेत. याशिवाय, मनपाकडून नळांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे दिवसरात्र मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

पोलीस विभागाने उभारली चौकी
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या वतीने चौकी उभारण्यात आली. पण, लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस कर्तव्यावर नाहीत. गुरूवारी मतदान झाल्यानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

सामाजिक संघटनांचे सहकार्य
महाप्रसाद वितरण करण्यासाठी वेगळा कक्ष तयार करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली. महाकाली महाप्रसाद वितरण समिती, जलाराम सेवा मंडळ, कोल कंत्राटदार मंडळ व जैन समितीने याकरिता पुढाकार घेतला आहे. वाहनांमुळे गर्दी होऊ नये, याकरिता वाहनतळ तयार झाला आहे.

दर्शन रांगेसाठी विशेष व्यवस्था
भक्तांच्या रांगेकरिता सहा हजार फु टाचा शेड तयार आहे. रांगेत उभे राहताना त्रास होऊ नये, या हेतुने मजबूत रेलिंग, पिण्याचे पाणी व पंख्यांची व्यवस्था पूर्ण झाली. गतवर्षीप्रमाणे यंदाही विजेवर चालणारे खास फ वारे तयार करण्यात आले. यातून मंदिर परिसरातील हवा बाहेर फे कली जाते. फ ॉगर सिस्टीममुळे मंदिर परिसरात थंडावा राहतो. बैल बाजार परिसरातही भक्तांसाठ ी निवास कक्ष तयार करण्यात आला. परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा पेट्यांची संख्या वाढविण्यात आली.

Web Title: Starting today, Goddess Mahakali Yatra starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.