पेरणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:50 AM2018-06-13T00:50:37+5:302018-06-13T00:50:37+5:30

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. कधी वेळेत न येणारा पाऊ स यावर्षी अगदी वेळेत दाखल झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Sowing time | पेरणीची लगबग

पेरणीची लगबग

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी सुखावला : काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी बळीराजा व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. कधी वेळेत न येणारा पाऊ स यावर्षी अगदी वेळेत दाखल झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी लागत असल्याने काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी पेरणीची लगबग वाढली आहे. सोमवारी जिल्ह्यात १८.७४ च्या सरासरीने २८१.२ मिमी पावसाची नोंद झाली.
यावर्षी लवकर व चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी आनंदी होते. अशातच वेळेत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी आता लगबग वाढली आहे. निसर्गाचा लहरीपणा, गुलाबी बोंडअळी, तोकडा हमीभाव, शेतमालाचे पडलेले भाव, उत्पादनात तोटा यामुळे यावर्षी शेतकरी चांगलाच काकुळतीला आला होता. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडल्यास भरघोस उत्पादन घेण्याचे स्वप्न शेतकºयांनी बाळगले आहे. सध्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरूवात केली आहे. मात्र गतवर्षीसारखा हा पाऊस शेवटपर्यंत साथ देईल का, अशी चिंता लागली आहे. तरीही पेरणीच्या कामांना शेतकºयांनी सुरूवात केली आहे.
आजपर्यंत १३७४.५ मीमी पावसाची नोंद
मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ९१.६३ च्या सरासरीने १३७४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस मूल तालुक्यात पडला असून या तालुक्यात १७९.६ मिमी, त्यापाठोपाठ सिंदेवाही तालुक्यात १३९.६ मिमी, गोंडपिपरी तालुक्यात १११.६, ब्रम्हपुरी तालुक्यात १०३.६ तर जिवती तालुक्यात १००.१ मीमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १२ जून पर्यंंत २.४४ च्या सरासरीने केवळ ३६.६ पाऊ स झाला होता

Web Title: Sowing time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी