चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:18 PM2018-02-07T23:18:54+5:302018-02-07T23:19:16+5:30

शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.

Six tankers ready for scarcity-stricken part of the Chandrapur | चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

Next
ठळक मुद्देमनपा आढावा बैठक : विविध विकास कामांवर चर्चा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.
स्थायी सभापती राहुल पावडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता अनिल घुमडे, अभियंता संजय जोगी उपस्थित होते. शहरात विशेष निधीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी दिला. संबंधित कंत्राटदारांच्या कामाची गती वाढवावी आणि सुरू असलेली कामे शीघ्रगतीने विहित मूदतीत पूर्ण करावी. यासाठी अधिकाºयांनी दिवसागणिक कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही या बैठकीतून देण्यात आले.
शासनाची स्वयंचलित पाणी पुरवठा योजना अमृत अंतर्गत शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पुढील ५० वर्षांची आवश्यकता लक्षात घेवून पाईपलाईन टाकताना आवश्यक तेवढेच खोदकाम करावे. पाईपलाईन उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण होवू नये.
खोदकामातून निर्माण होणारा मातीचा ढिगारा, धुळीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना कंत्राटदारांना देण्यात आली. त्रासदायक ठिकाणी कंत्राटदारांनी कामगार लावून साफसफाई करावी, खोदकाम परिसराची रोज एका ठराविक वेळेत पाहणी करून विकासकामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.
मनपा अधिकाºयांनी पाणी टंचाईबाबत सुरू केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती या आढावा बैठकीत सादर केली. शहरातील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने विहिरींची साफसफाई, खोलीकरण व दुरुस्ती केली जात आहे. हातपंप व कूपनलिका दुरुस्त करण्यासोबतच पाईप लाईन गळती बंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात ६ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. इरई धरण परिसरात विहिरी सभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. तसेच १० अतिरिक्त पंप लावून पाणी उचल करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती उपमहापौर फुलझेले व सभापती पावडे यांनी दिली. दाताळा येथील इरई नदीवर बंधारा बांधून शहरातील ४ विहिरींवर पंप लावण्याची प्रक्रिया केली जात आहे. हे काम झाल्यास उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर पूर्णत: मात करता येईल. शहरात विविध भागात कुपनलिका, हातपंप, विहिरीवर पंप बसविणे तसेच म्हाडा परिसरातून पाणी आणण्याकरिता शासनाकडून जादा मिळणार आहे, असा दावाही बैठकीत करण्यात आला.

Web Title: Six tankers ready for scarcity-stricken part of the Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.