दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी; तीन महिन्यांपासून अनुदानच नाही

By परिमल डोहणे | Published: October 6, 2023 03:42 PM2023-10-06T15:42:33+5:302023-10-06T15:45:05+5:30

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून ४८ शिवभोजन केंद्र

Shiv Bhojan Center Director who feeds the hunger of others is starving; There is no subsidy for three months | दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी; तीन महिन्यांपासून अनुदानच नाही

दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी; तीन महिन्यांपासून अनुदानच नाही

googlenewsNext

चंद्रपूर : सर्वसामान्य व गरजूंना केवळ दहा रुपयात जेवण देऊन भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्राच्या संचालकांचे मागील तीन महिन्यांचे अनुदान थकीत असल्याने केंद्र संचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित शिवभोजन केंद्रांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

गरजूंची भूक भागविता यावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यात शिवभोजन केंद्राची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरजूंना केवळ दहा रुपयात भोजन देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून ४८ शिवभोजन केंद्र आहेत. शहरी भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर ४० रुपये अनुदान तर ग्राहकांकडून दहा रुपये तर ग्रामीण भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर २५ रुपये अनुदान तर ग्राहकांकडून दहा रुपये घ्यायचे असतात. मात्र, मागील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे तीन महिन्यांचे अनुदान थकीत आहे. अनेकदा थकीत अनुदान देण्याची मागणी केंद्र संचालकांकडून करण्यात आली. मात्र, अद्यापही त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. परिणामी केंद्र संचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

किराण्याची उधारी थकली

मागील तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने केंद्र संचालक किराणा साहित्याची उधारीवर खरेदी करत आहेत. तीन महिन्यांपासून उधारी देत नसल्याने किराणा व्यावसायिकांनी केंद्र संचालकांना उधारी देणेच बंद केले आहे. त्यामुळे आता कुठून साहित्य आणायचे आणि गरजूंची भूक भागवायची? असा प्रश्न केंद्र संचालकांना पडला आहे.

अनुदान आल्यानंतर लगेच शिवभोजन केंद्र संचालकांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल. अनुदानासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे.

- अजय चरडे, जिल्हा पुरवठा अधिका

Web Title: Shiv Bhojan Center Director who feeds the hunger of others is starving; There is no subsidy for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.