शालू शिंदे आत्महत्या प्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:46 PM2018-01-18T23:46:30+5:302018-01-18T23:47:03+5:30

घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्याप्रकरणी आठ दिवसांनी घुग्घुस पोलिसांचे हात एका आरोपीपर्यंत पोहचले. घुग्घुस परिसरातूनच शेषराज देवराव मडावी(३२) रा. मारेगाव जि. यवतमाळ याला सोमवारी रात्री अटक केली आहे.

Shalu Shinde arrested in the case of suicide | शालू शिंदे आत्महत्या प्रकरणी एकाला अटक

शालू शिंदे आत्महत्या प्रकरणी एकाला अटक

Next
ठळक मुद्दे२१ पर्यंत पीसीआर : रहस्य उलगडणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्याप्रकरणी आठ दिवसांनी घुग्घुस पोलिसांचे हात एका आरोपीपर्यंत पोहचले. घुग्घुस परिसरातूनच शेषराज देवराव मडावी(३२) रा. मारेगाव जि. यवतमाळ याला सोमवारी रात्री अटक केली आहे. यामुळे शालू शिंदे प्रकरणाचे रहस्य उलगडतील असे बोलले जात आहे.
आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, शालू शिंदे यांना आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले. आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. अशातच शालू शिंदे यांच्या पतीने शालू यांचा मोबाईल पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली. पोलीस सूत्रानुसार मोबाईलमधील कॉल डिटेल्सच्या आधारे सदर आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. अधिक तपासात पोलीस सत्य उघडकीस आणणार आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Shalu Shinde arrested in the case of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.