१० टक्क्यांनी राख्या महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:49 AM2018-08-22T00:49:01+5:302018-08-22T00:49:31+5:30

रक्षाबंधन हा सण आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात राखीचे दुकाने सजली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या रंगीबिरंगी आकर्षक राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या असून भगीणी मोठ्या उत्साहाने आपल्या प्रिय भावासाठी राखी खरेदी करीत आहे.

Rough prices increased by 10 percent | १० टक्क्यांनी राख्या महागल्या

१० टक्क्यांनी राख्या महागल्या

Next
ठळक मुद्देदोनशे रुपयांपर्यंतची राखी विक्रीला : आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रक्षाबंधन हा सण आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात राखीचे दुकाने सजली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या रंगीबिरंगी आकर्षक राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या असून भगीणी मोठ्या उत्साहाने आपल्या प्रिय भावासाठी राखी खरेदी करीत आहे. महागाईमुळे १० टक्क्याने राखीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र जीएसटीतून राखीला वगळण्यात आल्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
रक्षाबंधन हा बहिण भावाचे पवित्र नाते जपणारा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून आपल्या पाठीमागे सदैव उभा राहण्याचे वचन घेत असते. येत्या २६ आॅगस्टला रक्षाबंधन असल्यामुळे चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात दुकाने सजली आहेत. यामध्ये गोलबाजार, गांधी चौक, जटपूरा गेटचा समोरील परिसर, कस्तुरबा चौक, रामनगर अशा शहरातील विविध चौकात राखीची दुकाने सजली आहेत. या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या रंगबिरंगी राखी, स्टोन असणाऱ्या राख्या, विविध प्रकारचे मणी असणाºया राख्या, जरी, सिल्वर, मेटल, अमेरिकन डायमंड, साध्या राख्या, धार्मिक धाग्यांच्या राख्या अशा पाच रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारामध्ये उपलब्ध झाल्या आहे.महिलावर्ग मोठ्या प्रमाणात राखी खरेदी करीत आहेत.
बालकांची ‘छोटा भीम’ला पसंती
टिव्ही मालिकेतील छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, शिंन चान, निजा हाथोडी या पात्राची चित्र असणाºया राखीचे बालकांत क्रेज वाढले आहे. जर लहान बालक दुकानात आल्यास तो छोटा भीमची राखी आहे का, असा प्रश्नच पहिले विचारत असल्याचे दुकानदाराने सांगितले.
वहिणीसाठी लुंबा राखी
यावर्षी लुंबा राखी बाजारात उपलब्ध असून ही राखी नणंद आपल्या वहिणीला बांधत असते. या राखीची किंमत १० पासून १५० रुपयापर्यंत आहेत. तर अनेक महिला आपल्या पतीलासुद्धा राखी बांधत असतात. त्यांच्यासाठीही विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. तर काही लोक घरी स्वत:च राखी तयार करुन हा सण साजरा करीत असतात.
गोंद्याला आजही मागणी
आजचे युवक किंवा युवती गोंदे खरेदी करीत नाही. मात्र जुन्या पिढीतील नागरिक गोंद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. अनेकजण गोंदे हे देवासमोर ठेवत असल्यामुळे त्याला देव राखी असेसुद्धा म्हणतात. आता गोंद्यामध्येसुद्धा विविध प्रकारची राखी उपलब्ध असून ज्येष्ठ महिलावर्ग मोठ्या प्रमाणात गोंदे खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Rough prices increased by 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.