भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:57 PM2018-06-19T22:57:24+5:302018-06-19T22:57:24+5:30

एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.

Rent, but give good service | भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

Next
ठळक मुद्देमागणी : प्रवाशांचा खासगी बसकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.
इंधनवाढ व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही कारणे पुढे करीत तूट भरुन काढण्यासाठी एसटीमहामंडळाने नुकतीच तिकीट वाढ केली. मात्र त्यामानाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या आहेत, अनेक खुर्च्यांची सिटकव्हर फाटली आहेत, खर्राच्या पिचकाºयांनी बस लाल झालेली आहे. खिडक्याचे काच फुटले आहेत, प्रवासादरम्यान एसटीला धक्का मारण्याची बाब तर नित्याचीच आहे. अशा विविध समस्या एसटीबसमध्ये आढळून येतात. मात्र याची सोडवणूक करण्यासाठी महामंडळाने कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रवासी आपोआपच खासगी वाहनाकडे वळत आहेत. परिणामी सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाणारे एसटीमहामंडळ दरवर्षी घाट्यात जात आहे. त्यातही आता तिकीट वाढविण्यात आली आहे. एकीकडे खासगी वाहनांमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत असूनसुद्धा २० ते २५ रुपयांनी तिकिट कमी आकारली जाते परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
बसमधील प्रथमोपचार पेटी गायब
अनावधानाने बसचा अपघात झाल्यास प्रवाशांनावर प्राथमिक उपचार पेटी बसविण्यात आल्या होत्या. मात्र सद्याच्या परिस्थितीत प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. काहीच बसमध्ये या पेटी आढळून येतात. मात्र त्याठिकाणी कोणतेही साहित्य दिसत नाही.
वासफाय सेवा ठप्प
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच बसमध्ये विना अडथळा नेट वापरण्यासाठी महामंडळाने एसटीमध्ये वुड डॉट काम या नावाने वायफास सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये निवडक गाणे, कार्टुन, व्हिडिओ बघता येत होते. मात्र सदर वायफाससेवा बºयाचदा सुरु होत नसल्यांचे प्रवासी सांगतात.
सौजन्य अभिवादन योजनेकडे दुर्लक्ष
मागील काही वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेनुसार प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर वाहक प्रवाशांना आपला परिचय करुन देतो. त्यानंतर तिकीटची रक्कम तसेच बसबद्दल माहिती देतो. मात्र सद्यास्थितीत ही योजना बंद झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Rent, but give good service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.