प्रश्न तुमचे उत्तर मुक्ता दाभोळकरांचे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:40 PM2018-09-19T22:40:59+5:302018-09-19T22:41:16+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व गोंडवाना शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री विद्यालयाच्या सभागृहात ‘अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आधारित अंधश्रद्धेवर प्रश्न तुमचे उत्तर अ‍ॅड. मुक्ता दाभोळकरांचे हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पार पडला.

Questions Your Answer Mukta Dabholkar's Program | प्रश्न तुमचे उत्तर मुक्ता दाभोळकरांचे कार्यक्रम

प्रश्न तुमचे उत्तर मुक्ता दाभोळकरांचे कार्यक्रम

Next
ठळक मुद्देअंनिसचा उपक्रम : विविध प्रश्नांचे केले निरसरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व गोंडवाना शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री विद्यालयाच्या सभागृहात ‘अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आधारित अंधश्रद्धेवर प्रश्न तुमचे उत्तर अ‍ॅड. मुक्ता दाभोळकरांचे हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. मुक्ता दाभोळकर तर प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा विभागाचे महाराष्ट्र प्रमुख कृष्णात कोरे, सहकार्यवाहक सुयश तोष्णीवाल, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, अंनिस चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुर्यकांत खनके, जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम जाधव, जया खनके, संध्या वाढई आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित अंनिस कार्यकर्ते, श्रोते व विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेवर विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अ‍ॅड. मुक्ता दाभोळकरांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. धर्मपुरीवार यांनी मानले.

Web Title: Questions Your Answer Mukta Dabholkar's Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.