प्रज्ञावंतांनी विकासात योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:04 AM2017-12-10T00:04:58+5:302017-12-10T00:07:02+5:30

येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या शाळेतून अनेक होतकरू व प्रज्ञावंत विद्यार्थी घडले. यापुढेही या शाळेतून असेच कर्तबगार व होतकरू विद्यार्थी घडावेत, ....

The professions should contribute to the development | प्रज्ञावंतांनी विकासात योगदान द्यावे

प्रज्ञावंतांनी विकासात योगदान द्यावे

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे आवाहन : चामोर्शीत जि.प. केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव थाटात

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या शाळेतून अनेक होतकरू व प्रज्ञावंत विद्यार्थी घडले. यापुढेही या शाळेतून असेच कर्तबगार व होतकरू विद्यार्थी घडावेत, असा मनोदय व्यक्त करीत या शाळेतील आजी-माजी व यापुढील प्रज्ञावंतांनी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
स्थानिक जि.प. केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सहउद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर तर अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथ बुरांडे, केशवराव भांडेकर, डॉ. वासलवार, पं.स. सभापती आनंद भांडेकर, न.पं. उपाध्यक्ष राहूल नैताम, पं.स. उपसभापती आकुली बिश्वास, अमित यासलवार, रवी बोमनवार, त्रियुगी दुबे, मनोहर पालारपवार, गजानन भांडेकर, अमोल आर्इंचवार, दिलीप चलाख, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, विद्या आभारे, शिल्पा रॉय, रंजिता कोडापे, डॉ. पियुष माधमशेट्टीवार, प्रकाश गेडाम, सभापती विजय शात्तलवार, अविनाश चौधरी, नगरसेवक प्रशांत एगलोपवार, कविता किरमे, बाळासाहेब दीक्षित, प्र.सो. गुंडावार, आनंद गण्यारपवार, निरज नामानुजनवार, हरेश गांधी, प्रा. हिराजी बनपुरकर, राजेश बाळराजे, मुख्याध्यापक मारडकर, लक्ष्मीकांत दीक्षित, रेवनाथ कुसराम, विशेष दोषी, जयराम चलाख, नरेश अलसावार, अमित यासलवार, मनमोहन बंडावार, माधवी पेशेट्टीवार, विष्णू ढाली, विनोद मडावी, रितेश पालारपवार, साईनाथ बुरांडे, दिलीप चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्याचे स्वप्न सरकारने उराशी बाळगल्यामुळे सद्य:स्थितीत देश प्रगतीपथावर चाललेला आहे. त्यामुळे येणाºया काळात गडचिरोली जिल्ह्याचा विकास निश्चितच होणार आहे. यासाठी आपण पूर्णत: प्रयत्न करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. देवराव होळी, संचालन सुनंदा पाटील यांनी केले तर आभार लालाजी मारटकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळा शताब्दी महोत्सव समिती, नगर पंचायत चामोर्शी व शहरातील नागरिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळेचे आजी-माजी विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२५ माजी विद्यार्थ्यांचा भावपूर्ण सत्कार
सदर शाळा शताब्दी महोत्सव कार्यक्रमात या शाळेच्या २५ माजी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
उद्घाटनानंतर शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट झाकी व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांनी भाषणातून सदर शाळेचा इतिहास उलगडला. याशिवाय या शाळेच्या स्मरणिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

Web Title: The professions should contribute to the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.