राष्ट्रीयीकृत बँकेअभावी अडचणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:08 PM2018-06-24T23:08:49+5:302018-06-24T23:09:06+5:30

Problems with the need for a nationalized bank | राष्ट्रीयीकृत बँकेअभावी अडचणी कायम

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी अडचणी कायम

googlenewsNext
ठळक मुद्देकोरपना, जिवतीच्या नागरिकांत रोष : गडचांदूर शहरात एकमेव राष्ट्रीयीकृत बँक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : औद्योगिक व कृषी क्रांती झालेल्या कोरपना व जिवती या तालुक्याच्या मुख्यालयी एकटी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरीक कमालीचे त्रस्त आहेत. कोरपना तालुक्यात ११३ तर जिवती तालुक्यात ८३ गावांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही तालुका मुख्यालयी राष्ट्रीयीकृत बँक स्थापन करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कोरपना व जिवती या तालुकास्थळी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, जि.प. शाळा व मोठी बाजारपेठ आहे. कोरपना, जिवती येथे कार्यरत अधिकारी कर्मचारी, व्यापारी प्राध्यापक वास्तव्यास राहतात. त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असणे अनिवार्य आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने सर्वांना वनसडी, गडचांदूर, आवारपूर, पाटण, कचठाळा, उपरवाही, लखमापूर येथे जाऊन व्यवहार करावे लागते.
कोरपना व जिवती या तालुकास्थळी राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेत जाण्या-येण्याचा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरपना परिसरात वनसडी व जिवती परिसरात पाटण येथेच एकमेव बँक असल्याने या शाखेचा व्याप वाढला आहे. त्यामुळे कोरपना व जिवती तालुका मुख्यालयी राष्ट्रीयीकृत बँकेची स्थापना करण्याची मागणी नागरिकांची आहे.
गडचांदुरात दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकता
औद्योगिक शहर गडचांदूर येथे एकमेव स्टेट बँक इंडिया शाखेची राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेत खातेदाराची संख्या प्रचंड असल्याने ग्राहकांची कामे वेळेवर होत नाही. परिणामी मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकरी, विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी , शिक्षक या सर्वाची खाते या बँकेत आहेत. तेव्हा शहरात दुसरी राष्ट्रीयकृत बँक स्थापन करावी, अशी मागणी येथील नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Problems with the need for a nationalized bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.