विसापूर रेल्वे फाटकाच्या बंदमुळे नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:50 AM2019-06-14T00:50:08+5:302019-06-14T00:51:03+5:30

विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला.

The people will wait for the closure of the Visapur railway track | विसापूर रेल्वे फाटकाच्या बंदमुळे नागरिक वैतागले

विसापूर रेल्वे फाटकाच्या बंदमुळे नागरिक वैतागले

Next
ठळक मुद्देमध्य रेल्वे प्रशासनाची मुजोरी : भुयारी मार्गात दिवाबत्तीची सुविधाही नाही, अनुचित घटना घडण्याची शक्यता

अनकेश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने मार्गावर दिवाबत्तीची सुविधा न करता ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक बुधवारपासून कायमचे बंद केले. परिणामी गावकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील तीनही रेल्वे लाईनवरून दररोज १५० वर रेल्वे गाड्याचे आवागमन होते. यामुळे मध्ये रेल्वे विभागाचे ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वेफाटक वाहन चालकांना त्रासदायक ठरले होते. यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहन चालकांना सदरचा मार्ग उपयुक्त आहे. परंतु पादचाऱ्यांना अनेक संकट आणणारा ठरला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाची किमान वर्षभर चाचणी घेवून ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाअक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. मात्र मग्रुर मध्य रेल्वे प्रशासनाचे तुघलकी निर्णय घेवून येथील नागरिकांना वेठीस धरले आहे.
येथील ग्रामपंचायत प्रशसनाने नागपूर मध्य रेल्वे विभागाकडे नागरिकांना ये - जा करण्यासाठी पादचारी पुलाचे बांधकाम करावे, भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची व्यवस्था करावी व पावसाळ्यात भुयारी मार्ग बंद राहण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात येवू नये, म्हणून पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. मात्र मध्य रेल्वे विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवित मुजारीने ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक कायम बंद केले. याबाबत नागपूर विभागाचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता उत्तरदेखील देण्याचे टाळले. यामुळे गावकºयात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, भुयारी मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची सुविधा नसल्याने असामाजिक तत्वाच्या लोकांकडून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी व दिवसादेखील एकही महिला जावू शकत नाही. पादचाºयांना भुयारी मार्गातून आवागमन करताना जिवावर बेतणारे ठरू शकते. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
 

Web Title: The people will wait for the closure of the Visapur railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे