४0 लाखांच्या बियाण्यांवर बंदीचे आदेश

By admin | Published: June 8, 2014 11:48 PM2014-06-08T23:48:12+5:302014-06-08T23:48:12+5:30

नियमानुसार खते व बियाण्यांची विक्री न करणार्‍या जिल्ह्यातील कृषी केंद्राची कृषी विभागाच्या पथकाने पहाणी केली यात अनियमितता आढळून आल्याने ४0 लाख रुपयांच्या बियाण्यांवर विक्रीबंदीचे आदेश देण्यात

Order to ban ban on 40 lakh seeds | ४0 लाखांच्या बियाण्यांवर बंदीचे आदेश

४0 लाखांच्या बियाण्यांवर बंदीचे आदेश

Next

कृषी विभागाची कारवाई : धाडसत्र सुरु, कृषी संचालक धास्तावले
चंद्रपूर : नियमानुसार खते व बियाण्यांची विक्री न करणार्‍या जिल्ह्यातील कृषी केंद्राची कृषी विभागाच्या पथकाने पहाणी केली यात  अनियमितता आढळून आल्याने ४0 लाख रुपयांच्या बियाण्यांवर विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात कापूस १७ लाख ७ हजार ४५0 रुपये, सोयाबीन १४ लाख २५ हजार ८४0, धान ८ लाख २ हजार ७८ रुपये, तर जैविक कीटकनाशक २८ हजार ८00 रुपयांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे  विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग वाढली. बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची कृषी केंद्रांमध्ये झुंबड उडत आहे. नेमकी हिच संधी साधून जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांनी अनाधिकृतपणे बियाणे विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. तसेच उगम प्रमाणपत्र नसणे, कृषी आयुक्तालयाकडून परवानगी न घेता बियाण्यांची विक्री करणे, बियाण्यांची माहिती  न कळविणे असा ठपका ठेवत कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथकाचे गठण केले आहे.  तपासणीदरम्यान जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, भद्रावती, वरोरा, टेमुर्डा, गडचांदूर, नागभीड, अहेरी आणि शेगाव येथील कृषिकेंद्रांतून ४0 लाख रुपयांच्या कापूस, सोयाबीन आणि धान बियाण्यांवर विक्रीबंदी घातली आहे. ( नगर प्रतिनिधी)
 

Web Title: Order to ban ban on 40 lakh seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.